Dhule Bribe News : विम्याची रक्कम उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी मागितली लाच; मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात
Dhule Bribe News : मंजुर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाच मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे एसीबीने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
Dhule Bribe News धुळे : मंजुर झालेल्या गट विम्याच्या बिलाची रक्कम शिंदखेडा उपकोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी लाच (Bribe) मागणाऱ्या दोंडाईचा येथील मुख्याध्यापिकेस धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule Anti-Corruption Bureau) रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दोंडाईचा येथील एका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षकाच्या (Teacher) मंजुर झालेल्या गट विम्याच्या बिलाची 1 लाख 33 हजार 484 रक्कम अदा होण्याकरिता त्यांनी शासकीय आश्रम शाळा, अक्कलकोस येथील मुख्याध्यापिकेकडे (Principal) रितसर अर्ज केला.
पाच हजारांच्या लाचेची मागणी
अर्ज करून देखील काम न झाल्याने त्यांनी मुख्याध्यापिका अर्चना बापुराव जगताप (Archana Jagtap) यांच्याकडे तगादा लावला. मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी गट विम्याच्या बिलाची रक्कम मिळवून देण्याकरिता पाच हजारांच्या लाचेची (Bribe) मागणी केली.
चार हजारांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ
तक्रारदरांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधून हकीकत कथन केली. दि.१ जानेवारी रोजी तक्रारीची शहानिशा झाल्यावर धुळे एसीबीच्या पथकाने शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, अक्कलकोस च्या आवारात सापळा रचला. या सापळ्यात मुख्याध्यापिका चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडली. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेस ताब्यात घेत दोंडाईचा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास धुळे एसीबी पोनि रूपाली खांडवी करीत आहेत.
या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली धुळे एसीबी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील, पोनि रूपाली खांडवी, पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागूल, मकरंद पाटील, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर गोरे, जगदीश बडगुजर या पथकाने ही कारवाई केली आहे.
लाचखोरीत नाशिक राज्यात अव्वल
दरम्यान, 2023 साली महाराष्ट्रात (Maharashtra News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1 हजार 170 आरोपींना ताब्यात घेतले आहे.803 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिक विभागात (Nashik Division) दाखल झाले आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या दमदार कामगिरीने नाशकात तब्बल 163 लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरला आहे. नाशिक पाठोपाठ पुणे विभागात १५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२५ गुन्हे दाखल झाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या