Dharashiv News: धाराशिवकरांनो तुम्ही पिता ते पाणी शुद्ध आहे काय? जिल्ह्यात 21 टक्के पाणी दूषित
Dharashiv News: जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे. हे पाणी स्त्रोत्र दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचं समोर आले आहे.
धाराशिव : धाराशिवमध्ये (Dharashiv News) 21% पाणी स्रोत्र दूषित असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीत ही गंभीर बाब उघड झालीय. हे पाणी स्त्रोत दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचं समोर आले आहे.जवळपास अकराशे स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील 21 टक्के साठा दूषित असल्याचं समोर आलंय. दरम्यान हे दूषित पाणी (Water Contamination) निर्जंतुकीकरण वापरण्याचा सल्ला प्रशासनानं दिलाय.
जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेने केलेल्या पाणी तपासणीत ही गंभीर बाब उघड झाली आहे. हे पाणी स्त्रोत्र दूषित असून पिण्यायोग्य नसल्याचं समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेने जिल्ह्यातील अकराशे दोन स्त्रोताची तपासणी केली असता त्यातून हे वास्तव उघड झाले असून या पाण्याचे निर्जंतुकीकरण करूनच पाणी प्यावे अशी आरोग्य विभागाच्या वतीने नोटीस काढून सांगण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ असून एक टक्के एवढा उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे त्यातच आता हे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्याने प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनी ही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
1102 स्त्रोतांची तपासणी
जिल्हा परिषदमध्ये जेवढे स्त्रोत आहेत त्याची तपासणी आम्ही वेळोवेळी करतो. आमच्याकडे एकूण 1102 स्त्रोतची तपासणी झाली यामध्ये 234 स्त्रोत दूषित आहेत. हे स्त्रोत दूषित आहे असा अहवाला नंतर त्याचे नमुने पुन्हा प्रयोगशाळेला पाठवले आहेत,असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आला. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर धाराशिव कळंब तालुक्याचे आमदार कैलास पाटील यांनी दूषित पाण्याचे नमुने हे पावसाळ्यात येतात मात्र या टंचाईच्या काळात दूषित नमुने येत असतील तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. जल जीवन मिशनच्या योजना मोठ्या प्रमाणात मंजूर असून, मी यासंदर्भात एक आढावा बैठक घेऊन ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी अशी सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र बरीच काम पूर्ण न झाल्यामुळे हा प्रश्न उन्हाळ्यामध्ये उद्भवलेला आहे. ही योजना लवकरात लवकर जर पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या पावसाळ्यात यापेक्षा सुद्धा जास्त दूषित पाण्याचे नमुने समोर येतील असा आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.
दूषित पाणी लोकांना पिण्याची वेळ
दरम्यान एकीकडे लोकांना पाण्यासाठी बनून भटकावे लागते आणि जेवढं पाणी मिळतंय ते देखील दूषित असल्याचं समोर आला आहे. उन्हाळ्यात जर अशी स्थिती असेल तर पावसाळ्यात अधिकच दूषित पाणी आता लोकांना पिण्याची वेळ येणार असून यासाठी तात्काळ शासनाने उपाययोजना करावी अन्यथा लोकांच्या जीवाशी चाललेला खेळ कधीपर्यंत सुरू राहणार आहे.