एक्स्प्लोर

केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, फडणवीसांची राहुल गांधींवर टीका

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.

मुंबई : केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर टीका केली आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये, असेही फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे, असे म्हणत राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. रेप इन इंडिया या वक्तव्यावर राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात येतेय. त्यावर राहुल गांधींनी आपण राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहोत. त्यामुळं माफी मागणार नाही असं वक्तव्य केलं होतं. यावर ट्वीट करताना फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वतःला 'गांधी' समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये!. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी 'गांधी' होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या जीवनाची आहुती मातृभूमीसाठी दिली. सर्वस्व अर्पण केले. त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरणे, हा देशासाठी परमोच्च त्याग करणाऱ्या तमाम देशभक्तांचा अवमान आहे. त्यामुळे आता आणखी एका विधानासाठी राहुल गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असे फडणवीसांनी म्हटलं आहे. हे ही वाचा - आम्ही नेहरू, गांधींना मानतो तुम्ही सावरकरांचा अपमान करू नका; संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा रणजित सावरकर यांची टीका तर राहुल गांधी यांच्या सगळ्याच गोष्टींमध्ये गफलत आहे. त्यांची कुठलीच वक्तव्य हे फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही. मात्र सत्तेच्या राजकारणासाठी कुणीही महापुरुषांवर चिखलफेक करू नये, अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली आहे. शिवसेनेने नेहमीच सावरकरांचा सन्मान केलेला आहे. यापुढेही सावरकरांच्या विरोधात जे जे बोलतील त्यांच्या विरोधात शिवसेना नेहमीच लढत राहील, अशी प्रतिक्रियाही सावरकर यांनी दिली आहे. संजय राऊत यांचा काँग्रेसला इशारा वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. नेहरू, गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनीही स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. आम्ही पंडित नेहरू, महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे. 'वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू ,गांधी यांच्या प्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला. अशा प्रत्येक दैवताचा सन्मान करायला हवा. इथे तडजोड नाहीत. जय हिंद'. असं एका ट्वीटमध्ये तर दुसऱ्या ट्वीटमध्ये "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे", असं राऊतांनी म्हटलं आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, "आम्ही पंडित नेहरू,महात्मा गांधी यांना मानतो तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करू नका.सुज्ञांस अधिक सांगणे न लगे". जय हिंद राहुल गांधी काय म्हणाले होते? काँग्रेसच्या 'भारत बचाओ' रॅलीत राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी देशाचा उल्लेख 'रेप इन इंडिया' केला होता. या वक्तव्यावरुन राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर "मी माफी मागणार नाही. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे", असं राहुल गांधींनी म्हटलं. मी मरेन मात्र माफी मागणार नाही. नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

EC Freeze TMC Name, Symbol : तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
तृणमूलच्या फुटीर गटाच्या हालचालींना वेग; निवडणूक आयोगाला दिली तीन नावं, कोणतं पक्षचिन्ह अन् नाव मिळणार याकडे सर्वांचं लक्ष
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
UPI Charges: '100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
'100 रूपयांवर फक्त 40 पैसे; तुमचा जीव जाणार आहे का?' UPI शुल्कावरून नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे वक्तव्य
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
भारतापुढं अफगाणिस्तानचं लोटांगण! तब्बल127 धावांनी भारतीय संघाचा विजय, 3-0 ने मालिकाही जिंकली
Embed widget