एक्स्प्लोर

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला पटियाला हाऊस कोर्टाची स्थगिती, उद्याची फाशी टळली

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणाने अवघा देश रस्त्यावर उतरला होता. या प्रकरणातील दोषींना उद्या 1 फेब्रुवारी रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार होती. मात्र ही फाशी उद्या देण्यात येणार नाही.

नवी दिल्ली : 2012 दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना उद्या दिल्या जाणाऱ्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने दिली पुढच्या आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश कुमारची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्यानंतर या सर्व आरोपींना उद्या, 1 फेब्रुवारी रोजा फाशी होण्याचे निश्चित झाले होते. मात्र आता या नराधमांची फाशी उद्यासाठी टळली आहे. दिल्लीच्या पटियाला कोर्टाने पुढच्या आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती दिली आहे. राष्ट्रपतींनी दया अर्ज फेटाळल्यानंतर यातील आरोपी मुकेशनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, कोर्टानं याचिका फेटाळली होती. फाशीच्या शिक्षेचा उशीर टाळण्यासाठी काय करता येईल फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या एका केसमधील निर्णय अडथळा ठरत आहे. 2014 मधील शत्रुघ्न चौहान प्रकरणात 'समाज हिता' साठी काही गोष्टी जोडण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी सुप्रीम कोर्ट तयार आहे. केंद्राच्या याचिकेवर तशी नोटीस जारी करण्यात आली आहे. केंद्र सरकारचं म्हणणं आहे की, शत्रुघ्न चौहान केसमध्ये सुप्रीम कोर्टाकडून दिलेले आदेश फाशीची शिक्षा अधिक कालावधीकरता टाळण्याचं कारण बनले आहेत. केंद्राने अशी मागणी केली आहे की, रिव्यू पीटीशन फेटाळल्यानंतर दोषींना क्यूरेटिव्ह दाखल करण्याची निश्चित अवधी ठरवली जावी. डेथ वारंट जारी झाल्यानंतर 7 दिवसांमध्येच दया याचिका दाखल करण्याची परवानगी दिली जावी. दया याचिका फेटाळल्यानंतर 14 दिवसांमध्ये कुठल्याही स्थितीत फाशी दिली जावी. बुधवारी, 29 जानेवारीला आरोपी मुकेशच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, सरकारने दिलेल्या दोन फाईल्स आम्ही पाहिल्या. सर्व कोर्टाचे निकाल आणि नोंदी राष्ट्रपतींकडे देण्यात आल्या आहेत. सर्व आवश्यक कागदपत्रे पाहून राष्ट्रपतींनी हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे कोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. राष्ट्रपतींचं पद आणि जबाबदारी मोठी आहे. आमचा विश्वास आहे की त्यांनी विचार करुनच निर्णय घेतला असणार. तर, कारागृहात मुकशचे होणाऱ्या शोषणासंदर्भात केलेल्या तक्रारीचा आणि फाशीचा काही संबंध नसल्याचं कोर्टानं सांगितलं होतं.

निर्भया प्रकरणातील दोषी मुकेशची फाशी निश्चित; सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली

यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 17 जानेवारीला मुकेशची दया याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणातील चार दोषींना 1 फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार असं निश्चित झाली होतं. पटियाला हाऊस कोर्टाने 17 जानेवारीला निर्भया प्रकरणातील चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार निर्भया प्रकरणातील चार दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार होती. यापूर्वी जारी केलेल्या डेथ वॉरंटनुसार या चारही दोषींना 22 जानेवारीला फाशी देण्यात येणार होती.
काय होती घटना - दिल्लीत 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये सहा जणांनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, तिला आणि त्याच्या मित्राला चालत्या बसमधून फेकून दिलं. नंतर पोलिसांनी निर्भयाला रुग्णालयात आणले. प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिला सिंगापूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. 29 डिसेंबर 2012 रोजी, सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निर्भयाचा मृत्यू झाला. एक सप्टेंबर 2013 रोजी कनिष्ठ कोर्टाने चार दोषी पवन गुप्ता, विनय शर्मा, मुकेश आणि अक्षय सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget