एक्स्प्लोर

'सिंघम अगेन'च्या अभिनेत्रीने केलं प्रियकराच्या भाच्याचं अपहरण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Singham Again Actress Kidnap Lover's Nephew : अभिनेत्री 'क्राइम पेट्रोल' शोमध्ये पोलिसाच्या भूमिकेत झळकली होती, आता तिने गुन्हा केला आहे. या प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे.

Singham Again Actress Arrested : सिंघम अगेन चित्रपटातील अभिनेत्रीला पोलिसांनी अल्पवयीन मुलाचं अपहरण केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीनेच गुन्हा केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेत्री शबरीनला मुलाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अभिनेत्री शबरीनला पालघरमधील तीन वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. वालीव पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शबरीन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका 'क्राइम पेट्रोल' मध्ये झळकली आहे. याशिवाय, ती आगामी सिंघम अगेन चित्रपटातही पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'सिंघम अगेन'च्या अभिनेत्रीने केलं प्रियकराच्या भाच्याचं अपहरण

अटकेत असलेल्या शबरीननं सांगितलं की, क्राइम पेट्रोलसारख्या गुन्ह्यावर आधारित सत्य घटनेवरील मालिकेत काम केल्यानंतरही ती ब्रिजेशच्या प्रेमात एवढी वेडी झाली होती की, ती स्वत: चं कामही विसरली होती. यामुळेचं शबरीनने हे टोकाचं पाऊल उचललं.
सिंघम अगेन'च्या अभिनेत्रीने केलं प्रियकराच्या भाच्याचं अपहरण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपहरण प्रकरणात बेड्या

शबरीनचे अपहरण केलेल्या चिमुकल्याचा काका ब्रिजेश सिंह याच्यासोबत प्रेमसंबंध होते. शबरीनला ब्रिजेशसोबत संसार थाटण्याची इच्छा होती. पण, त्यांच्या लग्नात धर्माचा मुद्दा अडसर ठरत होता. या प्रकरणात ब्रिजेशचा सहभाग आहे का, यासंदर्भात पोलिस तपास करत आहे. याचं कारण म्हणजे ब्रिजेशला एका अज्ञात महिलेसोबत पाहिलं गेलं होतं.

दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते

पोलिसांनी सांगितलं की, ब्रिजेश आणि शबरीनचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जात आणि धर्माच्या मतभेदामुळे ब्रिजेशच्या कुटुंबीयांनी त्यांचं लग्न नाकारलं. शबरीनने कुटुंबियांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण कुटुंबीयांनी सतत विरोध केल्यामुळे शबरीनने अपहरण करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं.

शाळेतून चिमुकल्याचं अपहरण

वालीव पोलिसांनी सांगितले की, ब्रिजेशचा भाचा प्रिन्स शाळेमध्ये आहे. शबरीन शनिवारी अकरा वाजण्याच्या सुमारास शाळेत पोहोचली आणि शाळा संपताच प्रिन्सला तिच्यासोबत घेऊन गेली. राजकुमार शबरीनला ओळखत असल्याने तोही तिच्यासोबत गेला. शबरीनने प्रिन्सला सांगितलं की, ती त्याला औषध आणण्यासाठी घेऊन जात आहे. शाळा सुटल्यानंतर जेव्हा प्रिन्स घरी परतला नाही तेव्हा कुटुंबीयांनी शाळेत चौकशी सुरू केली. तिथे त्यांना समजलं की, तो एका महिलेसोबत गेला होता.

सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

वालीव पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता शबरीन प्रिन्सला तिच्यासोबत ऑटो रिक्षात घेऊन जात असल्याचं दिसलं. त्याच्यासोबत आणखी एक महिलाही होती. यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून शबरीनला वांद्रे येथून अटक करून प्रिन्सला त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

कियारा अडवाणीला दक्षिण भारतातील राज्यांच्या नावांचा विसर, राम चरणांसमोर झालं त त-प प, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour D Gukesh World Chess Champion : युवा ग्रँडमास्टर डी. गुकेश बुद्धिबळाच्या पटावरचा 'राजा'Zero Hour Arvind Sawant : One Nation One Election विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार?Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Embed widget