Cotton Import Duty : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कच्च्या कापसावरील आयात शुल्क 30 सप्टेंबरपर्यंत माफ; शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार, रविकांत तुपकर यांचा इशारा
Cotton Import Duty : केंद्र सरकारने काल जाहीर केल्यानुसार 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ केल आहे.

Cotton Import Duty : केंद्र सरकारने काल जाहीर केल्यानुसार 19 ऑगस्ट 2025 ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीत कच्च्या कापसावरील 11% आयात शुल्क पूर्णपणे माफ केल आहे. देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणे, कपड्याच्या उद्योगाचा उत्पादन खर्च कमी करणे, निर्यात स्पर्धात्मकता सुधारून भारताच्या "मेक इन इंडिया" उपक्रमाला चालना देणे. अशा उद्देशाने अस्थाई स्वरूपात कापसावरील हे आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे मात्र देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कापसाचे भाव पडण्याची हि शक्यता आहे. आधीच कापूस उत्पादना वरील खर्च वाढलेला असताना हा निर्णय घेणे हा शेतकऱ्यांचा हिताचा नाही. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, असा इशारा शेतकरी नेते क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी यांनी दिला आहे.
कापसाला भाव मिळत नसल्याने आधीच कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि त्यामुळे वर्षानुवर्षे कापसाची शेती लागवड ही कमी होत आहे. अशातच सरकारकडून कापसावरील 11% आयात शुल्क माफ करण्यात आलंय. परिणामी, सरकारच्या या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची भीती शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी व्यक्त करत सरकारला इशारा दिलाय.
गेल्या तीन वर्षात राज्यातील कापूस लागवडीची स्थिती काय?
2023 - 42.22 लाख हेक्टर.
2024- 40.84 लाख हेक्टर.
2025- 25.57 लाख हेक्टर.
सरकारने कापूस आयात करण्यासंदर्भात 11 टक्के कर माफ केल्याने राज्यातील व देशातील कापसाचा दर अजूनही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस लागवड परवडण्याच्या बाहेर जाईल, अशी भीती आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान; कपाशीचे उभं पीक धोक्यात
वाशिम जिल्ह्यात 5 दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठं नुकसान झाल्याच चित्र आहे. वाशिमच्या कृष्णा शेत शिवारात कपाशी पीक धोक्यात आलंय. अति पावसामुळे कपाशीचे उभं पीक वाळायला सुरवात झालीय. साहेबराव राठोड यांच्या एक एकर शेतातील कपाशी अति पावसाने वाहून गेलीय, तर उर्वरित मुळा कुजून होऊन खराब होण्यास सुरुवात झाल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. परिणामी, शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























