देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना स्टिंगद्वारे अडचणीत आणण्याचा कट; व्यावसायिक संजय पुनमियांचा खळबळजनक दावा
एका स्टिंगद्वारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केला आहे.
मुंबई : व्यावसायिक संजय पुनमिया यांनी एका स्टिंगद्वारे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. या स्टिंगमध्ये माजी एसीपी सरदार पाटील हे एका अज्ञात व्यक्तीशी बोलत असून त्यात ते परमबीर सिंग आणि संजय पुनमिया यांच्यावर गुन्हा दाखल करून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अडचणीत आणण्याचा कट रचला गेला असल्याचा खुलासा केला आहे.
व्यावसायिक संजय पुनमियांचा खळबळजनक दावा
मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात त्यावेळचे सरकारी वकिल शेखर जगताप यांच्यावर बनावट कागदपत्र सादर करून सरकारी वकिल झाल्याचा आरोप केला आहे. तर ठाणे नगर पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी पदाचा दुरउपयोग करून संजय पुनामिया यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचा तपास सुरू ठेवल्याचा आरोप केला आहे. तसेच अन्य व्यापार्यांना धमकावून पैसे उकळल्याचा आरोप केला आहे.
वरील दोन्ही गुन्हे रद्द करण्यासाठी तत्कालीन सरकारी वकिल शेखर जगताप उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर संजय पुनामिया यांनी आक्षेप घेत, शेखर जगताप यांनी दाखल केलेल्या याचिके विरोधात उच्च न्यायालयात धाव घेत हस्तक्षेप नोंदवला. यावेळी संजय पुनामिया यांचे वकिल रिझवान मर्चंट यांनी या घटनेशी संबधित एक व्हिडिओही सादर केला आहे. या व्हिडिओत माजी एसीपी सरदार पाटील हे दिसत असून ज्यामध्ये ते दावा करत आहेत की, ही सर्व जुनी बातमी तत्कालीन सरकारच्या म्हणजेच महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली रेकॉर्ड करण्यात आली होती, त्यामागे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना अटक व्हावी हा हेतू होता.
विशेष सरकारी वकील म्हणून स्वत:ची गुन्ह्यात नेमणूक
यानंतर व्यापारी संजय पुनमिया यांच्या तक्रारीनंतर ठाणे नगर पोलिसांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात पुनमिया यांच्या तक्रारीवरून पांडे यांच्यासह निवृत्त एसीपी सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, वकील शेखर जगताप आणि बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल हा एकेकाळी या प्रकरणातील तक्रारदार पुनमियाचा व्यावसायिक भागीदार होता.
पुनामिया यांनी आरोप केला आहे की, सरदार पाटील आणि मनोहर पाटील या दोन पोलीस अधिका-यांनी बिल्डर अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्य शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांच्या सांगण्यावरून काम केले, तर वकील जगताप यांनी सरकारी कागदपत्र तयार केले आणि स्वत: ला न्यायालयाची दिशाभूल केली. तर स्वत:ची विशेष सरकारी वकील म्हणून या गुन्ह्यात नेमणूक केली. पोलिसांनी हा एफआयआर आयपीसी कलम १६६ (ए), १७०, १९३, १९५, १९९, २०३, २०५, २०९, ३५२, ३५५, ३८४, ३८९, ४६५, ४६६, ४७१, ५०६ नुसार नोंदवला होता.
हे ही वाचा