एक्स्प्लोर

Congress :शेकडो कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या दाराकडे धावले, पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, नागपुरात गोंधळ

गांधी कुटुंबीयांना ईडीची नोटीस दिल्यानंतर कॉंग्रेसच्यावतीने देशभरात आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या ईडी कार्यालयासमोरही जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

नागपूरः नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात गांधी कुटुंबीयांना नोटीस दिल्यानंतर सोमवारी कॉंग्रेसच्यावतीने नागपूरच्या ईडी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तीन तास चाललेल्या आंदोलनात अचानकपणे शेकडो कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांचा पहिला बॅरिकेट खाली पाडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाच्या मुख्य दारावर चढून आत शिरण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांसोबत कॉंग्रेस कार्यकर्त्यांची धक्काबुक्कीही झाली. मात्र, पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करत त्यांना थांबविले.

यावेळी बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, सध्या देशात हिटलरशाही सुरू आहे. अहंकारात असलेल्या हिटलरला शेवटी आत्महत्या करावी लागली होती, असे आपल्या देशात होऊ नये. आज काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते देशात विविध ठिकाणी रस्त्यावर आले आहे. हे फक्त ट्रेलर असून संपूर्ण पिक्चर अजून बाकी आहे, असा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला. ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे. आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आक्रमकतेने रस्त्यावर उतरले असते तर देशात आग लागली असती. मात्र देश सुरळीत चालावा, देशातील नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काँग्रेसने संयम बाळगला आहे असल्याचेही यावेळी राऊत आपल्या भाषणात म्हणाले.

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनात मंत्री विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी यांच्यासह अनेक माजी मंत्री आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, जेव्हा जेव्हा गांधी घराण्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला, तेव्हा तो राजकारणातून संपला आहे. हा देशाचा इतिहास आहे. जे इंग्रजांना नाही घाबरले ते तुम्हाला थोडी घाबरणार. आपल्या पक्षाचं चुकलं आपण गाफील राहिलो म्हणून देशात भाजपची सत्ता आली. मी नेहमी म्हणतो काँग्रेसमध्ये काम करण्याची ताकद दिली पाहिजे, मात्र आमच्याकडे काहींनी चापलुसी करणाऱ्यांना मोठे केले आणि म्हणून हे बोके सत्तेत जाऊन बसले असल्याची टीकाही स्वपक्षांवर त्यांनी केली.

पोलिसांनी धरणे प्रदर्शनाचा पेंडोल सोडून ईडी कार्यालयाच्या मुख्य दारातून आत शिरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, अभिजित वंजारी,  प्रतिभा धानोरकर यांच्यासह माजी मंत्री वसंत पुरके व शिवाजीराव मोघे या नेत्यांसह सुमारे 50 कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 August 2026: आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज पहिला श्रावणी शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मीच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Nuclear Attack : पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब हल्ला करणार; 'या' प्राध्यापकाचा मोठा दावा, या आधीची भविष्यवाणीही खरी ठरली
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget