Nagpur : नागरिकांनी विकासकामांच्या दर्जावर लक्ष ठेवावे, सलील देशमुख यांचे पुनर्वसित गावातील नागरिकांना आवाहन
वर्धा नदीच्या पुरामुळे बाधीत गावांसाठी 19 कोटींचा निधी मंजुर करण्यात आला. सलील देशमुख यांनी नरखेड तालुक्यातील खैरगाव, देवळी, देवग्राम, मदना , नायगाव धोटे व सहजापूर या येथील विकासकामांचा आढावा घेतला.
नागपूरः गावातील मंजुर असलेल्या कामांचा दर्जा हा चांगला व्हावा यासाठी मी आग्रही आहे. परंतु स्थानीक नागरीकांनी सुध्दा कामावर लक्ष ठेवून सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी केले आहे. नरखेड तालुक्यातील 1991ला आलेल्या वर्धा नदीच्या पुरामुळे बांधीत झालेल्या गावांसाठी 19 कोटी 16 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या ते पुनर्वसित गावाच्या विकास कामाचा आढावा घेत असतांना बोलत होते. सलील देशमुख यांनी शनिवारला नरखेड तालुक्यातील खैरगाव, देवळी, देवग्राम, मदना , नायगाव धोटे व सहजापूर या पुनर्वसीत गावात जावून त्यांनी कामांचा आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरखेड सुरेश आरघोडे, पंचायत समिती सभापती निलिमा रेवतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू हरणे, जिल्हा परिषद सदस्य बालू जोध ,दिक्षा मूलताईकर, , पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, वसंत चांडक,विघे गुरुजी, अनिल साठोने, दीपक चौधरी, अतुल पेठे, घनश्याम ठाकरे, मंगेश नासरे, प्रकाश टेकाडे रवी चौधरी प्रामुख्याने उपस्थीत होते. वर्धा नदीच्या पुरामुळे नरखेड तालुक्यातील मोवाड, जलालखेडा, खैरगाव, देवळी, देवग्राम, मदना, थडपवनी, अंबाडा, सायवाडा, खारगड, खेडी, खरबडी, पेठ मुक्तापुर, सहजापुर, नायगाव (धोटे) ही 15 गावे बांधीत झाली होती. या गावासाठी हा 19 कोटी 16 लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.
ही विकासकामे होणार
यात जलालखेडा येथे समाज मंदीर, रस्ता व नालीचे तर खैरगाव येथे रस्ते व नाली, देवग्राम येथे बस थांबा, बाजार ओटे, नाली. मदना येथे बस थांबा व नालीचे बांधकाम करणे. देवळी येथे अंतर्गत नाली व रस्त्यांची कामे. थडीपवनी येथे ग्राम पंचायत भवन, बस थांबा बाजार ओटे. अंबाडा येथे बाजार ओटे. सायवाडा येथे पोच रस्ता व नाली बांधकाम करणे. खारगड येथे नाली बांधकाम करणे. खेडी येथे गुरांसाठी पाण्याचा हौद व नाली बांधकाम करणे. पेठ मुक्तापुर येथे समाज मंदीर व नाली बांधकाम. खरबडी येथे समाज मंदीर, बाजार ओटे व नालीचे बांधकाम करणे. सहजापुर येथे शौचालय, बस थांबा व समाज मंदीराचे बांधकाम करणे. नायगाव येथे नाली, पोच रस्तासह बाजार ओटे व समाज मंदीराच्या बांधकामाचा यात समावेश आहे.
19 कोटींचा निधी मंजूर
प्रभावित गावांना निधी मिळावा अशी मागणी या भागातील नागरीक व लोकप्रतिनीधींची होती. ही बाब लक्षात घेवून या निधीच्या मंजुरीसाठी एक प्रस्ताव तयार करण्यासाठी सलील देशमुख अधिकाऱ्यांना विनंती केली होती. हा प्रस्ताव तयार झाल्यावर निधी मंजुरीसाठी सलील देशमुख यांनी मंत्रालय स्तरावर याचा पाठपुरवा केला. यासाठी संबधीत अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका सुध्दा घेतल्या. यानंतर सुरुवातीला पहील्या टप्यात 2 कोटी 73 लाख तर दुसऱ्या टप्यात 16 कोटी 43 लाख असा एकुण 19 कोटी 16 लाख रुपये मंजुर करण्यात आल्याचे सलील देशमुख यांनी सांगीतले.