Water Crisis: पुन्हा पाण्याची बोंबाबोंब! छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा फुटली
Chhatrapati Sambhaji Nagar : फारोळा येथील 100 एमएलडी पंपगृहातील जलवाहिनी फुटली असून, पंपगृहात व मोटारमध्ये पाणी शिरले आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहराला (Chhatrapati Sambhaji Nagar City) पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा एकदा फुटली असल्याने, पाणीपुरवठा एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर-पैठण रोडवरील फारोळा येथील 100 एमएलडी पंपगृहातील जलवाहिनी फुटली असून, पंपगृहात व मोटारमध्ये पाणी शिरले आहे. आज (27 मे) सकाळी 9 वाजता ही घटना घडली आहे. त्यामुळे याचा परिणाम आता शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
मागील काही दिवसांत छत्रपती संभाजीनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सतत फुटत आहे. त्यातच मे महिना सुरु असताना पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा जलवाहिनी फुटली आहे. फारोळा येथील 100 एमएलडी पंपगृहातील जलवाहिनी फुटली असून, पंपगृहात व मोटारमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र यासाठी तब्बल 16 तास लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे याचे परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होणार आहे.त्यामुळे नागरिकांनी पाणी जपवून वापरण्याची गरज आहे.
मागील काही दिवसांत जलवाहिनी सतत फुटत आहे. पैठण रस्त्याचे चौपदरीकरण सुरु असल्याने जलवाहिनी काम करताना फुटत आहे. विशेष म्हणजे अचानक बिघाड किंवा जलवाहिनी फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. दरम्यान आजही फारोळा येथील पंपगृहातील जलवाहिनी फुटली असून, यामुळे पंपगृह आणि त्यातील मोटारमध्ये पाणी गेले. ही बाब लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी लागलीच येथील वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे पाणी उपसा ठप्प झाला असून, यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे.
शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलावे लागणार
फारोळा येथील पंपगृहातील जलवाहिनी फुटल्याने दुरुस्तीसाठीचे काम हाती घेण्यात आले आहेत. यासाठी पाणीपुरवठा विभागाचे टीम दुरुस्तीसाठी प्रयत्न करत आहेत. तर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचारी देखील दुरुस्ती करत आहेत. तर पुन्हा पाणी उपसा सुरु करणे यासाठी तब्बल 16 तास लागणार असल्याचा अंदाज आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलावे लागणार आहे. त्यामुळे याच फटका शहरवासीयांना बसणार आहे.
रस्त्याचे काम सुरु...
छत्रपती संभाजीनगर-पैठण रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. दरम्यान याच रस्त्याच्या बाजूने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य जलवाहिन्या देखील टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे काम करत असताना जेसीबी, पोकलनचा धक्का लागल्याने या जलवाहिन्या सतत फुटत आहे. मुळात या दोन्ही जलवाहिन्या कालबाह्य झाल्या असल्याने अनेकदा फुटत असतात. आधीच शहरातील अनेक भागात आठ दिवसांनी पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच सतत जलवाहिनी फुटत असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: