Uniform Civil Code : समान नागरी कायद्याविरोधात असदुद्दीन ओवेसींकडून औरंगाबादेत आज चर्चासत्र
Asaduddin Owaisi : ओवेसी हे औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर असून, समान नागरी कायद्यावर ते काही मान्यवरांसोबत चर्चा करणार आहे.
![Uniform Civil Code : समान नागरी कायद्याविरोधात असदुद्दीन ओवेसींकडून औरंगाबादेत आज चर्चासत्र Uniform Civil Code Seminar in Aurangabad today by Asaduddin Owaisi against Uniform Civil Code Uniform Civil Code : समान नागरी कायद्याविरोधात असदुद्दीन ओवेसींकडून औरंगाबादेत आज चर्चासत्र](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/11/c248c4228e901dbc39eff7cff3aa52d11689051836658737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Asaduddin Owaisi On Uniform Civil Code : देशात मोदी सरकारकडून समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याबाबत चर्चा सुरु असल्याने याचे राजकीय पडसाद देखील उमटताना पाहायला मिळत आहे. समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाला आतापर्यंत अनेक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी विरोध देखील केला आहे. त्यामुळे सध्या हा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान अशातच एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी या कायद्याला विरोध केला आहे. तर आज ओवेसी हे औरंगाबादच्या (Aurangabad) दौऱ्यावर असून, समान नागरी कायद्यावर ते काही मान्यवरांसोबत चर्चा करणार आहे.
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी हे आज (11 जुलै) रोजी औरंगाबाद शहरात येत आहेत. केंद्र सरकारच्या वतीने येत्या पावसाळी अधिवेशनात संसदेत समान नागरी कायदा बिल आणण्याची तयारी सुरू आहे. त्यावर ओवेसी हे शहर आणि जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांसोबत चर्चा करतील. निराला बाजार येथील तापडिया नाट्यमंदिरात दुपारी 2 वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष शारेक नक्षबंदी यांनी दिली आहे. त्यामुळे यावेळी ओवेसी काय भूमिका मांडणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंचा पाठिंबा?
समान नागरी कायद्यासंदर्भात (Uniform Civil Code) वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत. दरम्यान याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील भूमिका समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ठाकरेंच्या बैठकीत समान नागरी कायद्यासंदर्भात चर्चा झाली. या कायद्याला आमचा पाठिंबा असून जोपर्यंत मसुदा या कायद्यासंदर्भात समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणे किंवा भूमिका योग्य नसल्याचं यावेळी बैठकीत चर्चा झाली असल्याचे बोलले जात आहे. तर समान नागरी कायद्याला पाठिंबा असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले, असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.
शरद पवारांची भूमिका?
केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी सुरू केली असून, पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया आली आहे. समान नागरी कायद्यावर कोणताही निर्णय घेण्याआधी तो शीख, जैन आणि पारशी समूदायाला मान्य आहे का?, हे पाहावे. त्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका आम्ही मांडू असंही शरद पवार म्हणाले. समान नागरी कायद्याला शीख समूदायाचा विरोध असल्याची मला माहिती आहे असं शरद पवारांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)