एक्स्प्लोर

आता बघ्याची भूमिका घेऊ नका, थेट कारवाई करा; हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना सूचना

Maratha Reservation : यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना (Police) देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आता अलर्ट मोडवर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवून देण्यात आली. सोबतच राष्ट्रवादीचे कार्यालय देखील पेटवण्यात आले. बीड शहरातील बस स्थानकात आंदोलकांनी तब्बल 72 बस फोडल्या. तिकडे हिंगोली जिल्ह्यात देखील भाजपचा कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकंदरीत या सर्व परिस्थितीनंतर मराठवाड्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता थेट कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस देखील अलर्ट झाले आहे. 

पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याने पोलीस देखील आता अलर्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीस या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषण आणि आंदोलन याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. सोबतच राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि पोलीसांच्या बैठकीत काय काय घडलं?

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिसंक वळण लागत असल्याने याची दखल घेत, सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांची बैठक झाली आहे. यावेळी पोलीस महसंचालक यांनी सोमवारी दिवसभराच्या घडामोडींचा आढावा सादर केला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत, य समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे, घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे, जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात,  या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या तयार करण्यात येत आहेत, गुप्तचर यंत्रणा यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Manoj Jarange: जाळपोळ झाल्यास वेगळा निर्णय, मनोज जरांगेंचा मराठा आंदोलकांना इशारा; तर सत्ताधारी जाळपोळ करत असल्याचा जरांगेंना संशय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget