एक्स्प्लोर

MVA : मोठी बातमी, प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या खासदाराची 'कारण' सांगत काँग्रेसकडे तक्रार, मविआत नवा पेच?

Nagesh Patil Ashtikar : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एक पत्र काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांना पाठवलं आहे.

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीनं (MVA) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) 48 पैकी 30 जागांवर विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाच्या 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCPSP) 8 आणि काँग्रेसच्या (Congress) 13 अशा एकूण 30 जागांवर मविआनं विजय मिळवला.  महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणूक देखील संयुक्तपणे लढवणार असल्याचं केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातील काही गोष्टी समोर येत आहेत. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Ashtikar) यांनी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्याबद्दलची तक्रार काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे केली आहे. नागेश पाटील आष्टीकर यांच्या या पत्रानंतर महाविकास आघाडीत सर्व आलबेल आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. 

नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्रात नेमकं काय?

के.सी. वेणूगोपाल यांना लिहिलेल्या पत्रात नागेश पाटील आष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात हिंगोली मतदारसंघातील प्रज्ञा सातव यांच्या भूमिकेबद्दल आणि कृतीबद्दल तक्रार केली आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात प्रज्ञा सातव यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या भूमिकेच्या  विरोधात काम केल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे, असंही नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. 

प्रज्ञा सातव यांनी पक्षाच्या सूचनांचा विरोध करत वंचित बहुजन आघाडी आणि एनडीएच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप देखील नागेश पाटील आष्टीकर यांनी केला. लोकसभा निवडणुकीत त्या एकाही प्रचार मोहिमेत त्या एकाही सभेत सहभागी झाल्या नाहीत, असं देखील नागेश पाटील आष्टीकर म्हणाले. 

MVA : मोठी बातमी, प्रज्ञा सातव यांच्यावर कारवाई करा, ठाकरेंच्या खासदाराची 'कारण' सांगत काँग्रेसकडे तक्रार, मविआत नवा पेच?
नागेश पाटील आष्टीकर यांनी के.सी. वेणूगोपाल यांच्याकडे  या प्रकरणाच्या चौकशीची प्रज्ञा सातव यांच्या निवडणुकीच्या काळातील भूमिकेची चौकशी करुन राज्यात इंडिया आघाडीची एकजूट कायम ठेवण्यासाठी योग्य शिस्तपालनासंदर्भातील कारवाई करा, अशी विनंती नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे. 

मविआत नव्या वादाला तोंड फुटणार ?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या  प्रज्ञा सातव यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे केली आहे. या प्रकाराची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही आष्टीकर यांची आहे. नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेल्या या आरोपाने महाविकास आघाडीत आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बाबुराव कदम यांचा पराभव करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

संबंधित बातम्या :

''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला

आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget