एक्स्प्लोर

मोठी बातमी! अब्दुल सत्तारांना दे धक्का, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार अन् संजना जाधवांचा अर्ज बाद

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती

छत्रपती संभाजीनगर : राज्यात एकीकडे विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून दुसरीके छ. संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकांनीही राजकारण तापलं आहे. विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी तलवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्यान झाली. अखेर, विधानपरिषद निवडणुकीतून त्यांनी आपल्या मुलाचा अर्ज माघारी घेतल्याने येथील भाजप उमेदवाराचा विजय सोपा झाला. मात्र, सध्या सुरू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DDC bank) निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार (Abdul sattar) यांचा अर्ज बाद झाला आहे.   

संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदासाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी उशिरापर्यंत सुरू होती. येथे, पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार संजना जाधव, रमेश बोरनारे, समीर सत्तार यांच्यासह 14 जणांच्या अर्जांवर आक्षेप नोंदविण्यात आले. त्यावरील सुनावणी सायंकाळी उशीरा संपली. दरम्यान, या छाननीत अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार यांचा आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्य मुलीचा म्हणजे संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. 

जिल्हा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम 1 जून रोजी प्रसिद्ध झाला असून पहिल्या दिवसापासूनच अर्ज विक्री आणि स्वीकारण्यास सुरुवात झाली होते. या निवडणुकीत संचालकपदासाठी शुक्रवारपर्यंत एकूण 214 उमेदवारांजे अर्ज दाखल झाले होते. त्यात, मंत्री, आमदार, खासदारांच्या मुलांसह दिग्गजांच्या अर्जाचा समावेश होता. मात्र, या दिग्गजांपैकी दोन दिग्गज नेत्यांचा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर अब्दुल सत्तार यांचा आणि कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव यांचा अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, 8 जुलै रोजी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. 

700 कोटींची उलाढाल, भाजप ताकद लावणार

दरम्यान, 700 कोटींची वार्षिक उलाढाल आणइ जिल्ह्यात बँकेच्या 137 शाखा असलेल्या जिल्हा बँकेच्या तब्बल 3137 कोटींच्या ठेवी आहेत. मागील संचालक मंडळाच्या निवडणुकीत ही बँक शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या रुपाने पहिल्यांदाच काँग्रेसेतर नेतृत्वाकडे गेली. आता, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारत शिवसेनेला मागे टाकले आहे. भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा डोळा आता सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आहे. त्यामुळे, कधीकाळी काँग्रेसचं वर्चस्व असलेल्या या बँकेत आता भाजपने ताकद लावली आहे. त्यातच, समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपची डोकेदुखी आणखी कमी झाली आहे. 

हेही वाचा

छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget