एक्स्प्लोर

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : छगन भुजबळ म्हणाले, 'मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळातील प्यादा नाही'; सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'ते माझ्याबद्दल...'

Sunil Tatkare On Chhagan Bhujbal : मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा खेळाडू नाही. त्यावर सुनील तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया देत भुजबळ माझ्याबद्दल असे बोलले असतील असे मी मानत नाही असं म्हणालेत.

मुंबई :  राज्यसभेवरती संधी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली खदखद बोलून दाखवली. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या मुलांना राज्यसभेत संधी दिली जाते. तसे माझ्या पुतण्याला मंत्रिपद द्या मी राज्यसभेवर जातो, अशी माझी मागणी होती. मात्र, तसे झाले नाही या शब्दात ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांचं देखील नाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. राज्यसभेवरती खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कट्टर समर्थक राजेंद्र जैन यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. जैन यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भुजबळ हे विधान भवनात सोमवारी उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भावना व्यक्त केली. भुजबळ म्हणाले, "सुनेत्रा पवार, तटकरे आणि इतरांची मुलं राज्यसभेवर आणि इकडे मंत्री आहेत. मीसुद्धा हा पक्ष स्थापन करण्यापासून पुढाकार घेतला आहे. मलासुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे ही माझी मागणी होती. पण हे चालायचंच, मी कबड्डीचा खेळाडू आहे, बुद्धिबळाचा खेळाडू नाही. त्यावर सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील प्रतिक्रिया देत भुजबळ माझ्याबद्दल असे बोलले असतील असे मी मानत नाही असं म्हणालेत.(Sunil Tatkare) 

Sunil Tatkare on Bhujbal : भुजबळ बुद्धिबळही चांगले खेळतात : तटकरे

माध्यमांशी बोलताना भुजबळ यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता सुनील तटकरे म्हणाले, "ते कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते बुद्धिबळही चांगले खेळतात. ती भुजबळांची बोलण्याची शैली आहे. ते माझ्याबद्दल असे बोलले असतील असे मी मानत नाही. माझा राजकीय प्रवास आणि कारकीर्द त्यांना चांगली माहिती आहे. त्यांचा मान मोठा आहे. त्यांना अभिप्रेत गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत आणि पुढेही घडतील असंही तटकरे म्हणालेत."

त्याचबरोबर ते लोकसभेला वगैरे बोललेत राज्यसभेला बोललेत. ते काय मला उद्देशून बोलले असतील असं काय मला वाटत नाही.
ते जे बोललेत ते बिलकुल मी माझ्या अंगावरती घेणार नाही. मी लोकांच्यातून निवडून आलो आहे, मी स्वतः, माझी मुलगी, आता अनिकेची निवडणूक सुद्धा निवडणूक होती, ती बिनविरोध झाली हा भाग वेगळा. त्यामुळे ते तसं असेल असं मला बिलकुल वाटत नाही माझे त्यांचे गेल्या ३५ ते ४० वर्षांचे स्वहार्धाचे संबंध आहेत, साहेबांचा मुळताच आक्रमक स्वभाव हा अनेक वर्षांमध्ये अनेकांनी महाराष्ट्रामध्ये पाहिलेला आहे, पण आजच वक्तव्य त्यांचं आक्रमकतेच द्योतक नव्हतं, त्यांनी त्यांची एक पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला असावा,असंही तटकरेंनी म्हटलं आहे.

Rajendra Jain:  प्रफुल पटेलांचे अत्यंत विश्वासू शिलेदाराची राज्यसभेवर वर्णी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच भाजपच्या नवनीत राणा यांच्याही नावाची चर्चा रंगल्याने भूवया उंचावल्या होत्या. मात्र, अखेर पक्षाकडून राजेंद्र जैन यांच्या पारड्यात वजन टाकण्यात आले. राजेंद्र जैन प्रफुल पटेल यांचे विश्वासू शिलेदार ते एकेकाळी त्यांचे स्वीय सहाय्यक राहिले आहेत. 

Rajendra Jain:  कोण आहेत राजेंद्र जैन?

राजेंद्र जैन हे पूर्व विदर्भातील, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातील एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातील एक प्रमुख नेते म्हणून त्यांची ओळख आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि एकेकाळचे स्वीय सहाय्यक (PA) म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत काम करत असतानाच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सक्रिय वावर आणि प्रभाव वाढत गेला.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Vinayak Raut : ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
ती घरातून जाताना स्त्रीधन, 10-12 बॅग भरुन कपडे घेऊन गेली, त्यानंतर फ्लॅट, गाडी, कोट्यावधी रूपयांची डिमांड, विनायक राऊतांनी सगळंच काढलं
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Embed widget