शरद पवारांचा अजितदादांना छुपा पाठिंबा; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा, पाहा काय म्हणाले?
Sanjay Shirsat : शरद पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात त्याबाबत कधी बोलत नाही असेही शिरसाट म्हणाले.
औरंगाबाद : अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं दिसून आलं. मात्र, यावर खुलासा करतांना पहाटेच्या शपथविधीच्या वेळी एकदा संधी दिली होती. दुसऱ्यांदा संधी द्यायची नसती असे वक्तव्य शरद पवारांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. तर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी यावरून मोठा दावा केला आहे. शरद पवारांचा अजितदादांना छुपा पाठिंबा असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
याबाबत बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवार यांनी जे काही सांगितले ते अत्यंत बरोबर आहे. अजितदादांना एक संधी दिली, आता दुसरी संधी देणार नाही. कारण आहे आता तिथेच राहायचं आणि इतर कुठेही जायचं नाही असे त्याचा अर्थ आहे. त्यामुळे दिलेली संधी बदलत नाही. तीच संधी योग्य असल्याचं त्याचं म्हणणं असावे असं दिसतंय. तर शरद पवारांची भूमिका काय आहे हे समजण्यासाठी आणखी वेळ लागेल. सुप्रिया सुळे यांना शरद पवारांना आणखी पुढे आणायचे असून, त्यात गैर काहीच नाही. पण याचा अर्थ शरद पवार हे अजित पवारांच्या विरोधात असल्याचं कुठेही वाटत नाही. त्यांच्या पक्षाच्या अंर्तगत जरी प्रश्न असला, तरीही त्यांनी घेतलेली भूमिका कोठेही कणखर वाटत नाही. याचा अप्रत्यक्षपणे का होईना शरद पवारांचा अजितदादांना छुपा पाठिंबा असल्याचे दिसत आहे.
पवार जे बोलतात ते करत नाहीत...
दरम्यान पुढे बोलतांना संजय शिरसाट म्हणाले की, आमच्या पक्षात कोणतेही फुट पडली नसल्याचं वक्तव्य काल शरद पवारांनी केले होते. मात्र, काही तासातच त्यांनी आपले ते वक्तव्य बदलले. राज्याच्या राजकारणात हा जो काही गोंधळ चालला आहे, त्यामुळे शरद पवारांची नेमकी भूमिका काय आहे हे अनेकांना कळण्यासाठी वेळ लागतो. अजित पवारांनी यावर नो कमेंट्स म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांनी तर आमचे मोठे नेते अजित दादा असल्याचं मान्य केलं आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की, शरद पवारांनी आपली भूमिका तातडीने का बदलली यावरून अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. मात्र तसे काही असण्याचे कारण नाही. कारण शरद पवार जे बोलतात ते करत नाही. तसेच जे करतात त्याबाबत कधी बोलत नाही, असे शिरसाट म्हणाले.
इतर महत्वाची बातमी: