एक्स्प्लोर

Samrudhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात, बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा

Samruddhi Mahamarg Expressway accidents : अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. 

Samrudhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Highway) अपघाताची मालिका काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. आता औरंगाबादच्या (Aurangabad) सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर पुन्हा ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघातात ट्रॅव्हल्स समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाला आहे. या अपघतात 20 जण जखमी झाले असून, त्यातील 11 जणांना उपचार करुन सोडण्यात आले आहे. तर 9 जणांवर शासकीय घाटी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील मदत यंत्रणेने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. 

1 जुलै रोजी बुलढाणा येथील खाजगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याने 25 प्रवाशांनी आपला जीव गमवला. विशेष म्हणजे या घटनेनंतर देखील समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताची मालिका सुरुच आहे. अनेक ठिकाणी छोटे-मोठे अपघात सुरु आहे. दरम्यान औरंगाबादच्या सावंगीजवळील समृद्धी महामार्गावर रात्रीच्या सुमारास अपघात झाला आहे. ट्रॅव्हल्स आणि ट्रकच्या अपघात झाला असून, यात 20 जण जखमी झाले आहेत. तर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना घाटी रुग्णालयात हलवले. सध्या 9 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून, 11 जणांवर प्राथमिक उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. 

Nagpur-Mumbai Expressway : जालन्यातही अपघात... 

दरम्यान आणखी एका घटनेत जालना येथील समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका समोर आली आहे. चालकाला डुलकी लागल्याने नियंत्रण सुटून कार उलटल्याची घटना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील जालना जिल्ह्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. यात सात जण जखमी झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. भरधाव कार क्रमांक (एमएच 47- क्यू 2249) ही नागपूरहून मुंबईकडे जात होती. जालना जिल्ह्याच्या हद्दीत आल्यावर कार उलटली. यात सय्यद मुसेफ (वय 25 वर्षे), आश्रिया बेगम (34 वर्षे), शेख हरुण (वय 38 वर्षे), सय्यद झकेरिया (वय 8 वर्षे), सय्यद फातिमा (वय 1 वर्षे), तसलीम शेख (वय 46 वर्षे), अब्दुल गुरमीत (वय 25 वर्षे, सर्व रा. परभणी) हे जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Samruddhi Mahamarg Expressway accidents : अपघाताची मालिका सुरुच....

राज्याच्या विकासात मोठा योगदान ठरणार हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. मात्र समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून सतत होणाऱ्या अपघातामुळे चर्चेत आला आहे. रोज छोटे-मोठे अपघात या महामार्गावर सुरुच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी योग्य उपयोजना करण्याची मागणी केली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Samruddhi Highway : समृद्धीवर विश्रांतीसाठी कुठे थांबावं? बुलढाण्यातील अपघातानंतर हेल्पलाईनवरील फोन कॉल वाढले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Embed widget