एक्स्प्लोर

मराठवाड्यात लोकसभा जागावाटपावरून कुरघोडीचे राजकारण; महायुतीसह महाविकास आघाडीत निर्णय होईना?

Marathwada Lok Sabha Election Seat Allocation : मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावरून महायुतीत आणि महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण पाहायला मिळत आहे. 

Marathwada Lok Sabha Election Seat Allocation : शिवसेनेत (ShivSena) दोन गट निर्माण झाले असून, अशीच काही अवस्था राष्ट्रवादीची (NCP) देखील झाली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) मतदारसंघावर दावे वाढले आहेत. विशेष म्हणजे एकच मतदारसंघात युतीत असलेले पक्ष दावे करत आहेत. मराठवाड्यात (Marathwada) बहुतांश जिल्ह्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्यावरून महायुतीत (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) असलेल्या पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण (Politics) पाहायला मिळत आहे. 

मराठवाडा शिवसेना-भाजपा युतीचा बालेकिल्ला समजला जातो. 2014-2019 मधील लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात शिवसेना भाजपा युतीचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणामध्ये युती आघाड्याचं गणित बिघडले. त्यातच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडाने भर घातली.  दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीत देखील या बदलत्या राजकारणाचे परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात पक्षांचे एकमत होत नसल्याचे चित्र आहे. 

2019 मध्ये युतीत लोकसभा जागावाटप कसे होते? 

  • छत्रपती संभाजीनगर : शिवसेना 
  • जालना : भाजपा 
  • हिंगोली : शिवसेना 
  • परभणी : शिवसेना
  • नांदेड : भाजप 
  • बीड : भाजप
  • लातूर : भाजप 
  • धाराशिव : शिवसेना

लोकसभाचे जागेवरून महायुती आणि महाविकास आघाडीत राजकारण 

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर वगळता शिवसेना-भाजपा युतीने मराठवाड्यात निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांपैकी सात जागा युतीच्या ताब्यात होत्या. केवळ संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा पराभव करत एमआयएमचा उमेदवार लोकसभा निवडणुकीत विजयी झाला होता. मात्र, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडाने मराठवाड्यातल्या लोकसभा निवडणुकीचे गणितचं बिघडली आहेत. त्यात खास करून छत्रपती संभाजीनगरची जागा कोण लढवणार, हिंगोलीत कोणाला जागा मिळणार आणि परभणीमध्ये युतीत कोणत्या पक्षाला संधी मिळणार यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत राजकारण सुरु आहे.

संभाजीनगरची जागा कुणाकडे? 

महाविकास आघाडीमध्ये छत्रपती संभाजीनगरची जागा ठाकरे गटाला निश्चित जाईल, कारण काँग्रेसचा या मतदारसंघात गेल्या 25 वर्षापासून पराभव होतोय. तर, राष्ट्रवादीकडून ही जागा लढवली गेली नाही. पण, दुसरीकडे महायुतीमध्ये शिंदे गटाकडून या मतदारसंघावर दावा केला जात असतानाच, भाजपकडून गेल्या पाच वर्षांपासून याच मतदारसंघाच्या लोकसभा जागेसाठी तयारी सुरु आहे. 

परभणी लोकसभेच्या जागेवरून जोरदार चढाओढ

महायुतीमध्ये परभणी लोकसभेच्या जागेवरून जोरदार चढाओढ सुरू आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ही जागा आम्हीच लढवणार आणि जिंकणार असा दावा करण्यात आलाय. परभणी आणि शिवसेना हे समीकरण असुन, इथे 35 वर्षापासून शिवसेनेचे वर्चस्व असल्याने ही जागा शिंदेंची शिवसेनाच लढणार आणि जिंकणार असा दावा शिंदेंच्या नेत्यांकडून करण्यात आलाय. भाजपने तर मोदींच्या 400 जागा पार करण्यासाठी ही जागा भाजपलाच मिळायला हवी आणि आमचे संघटनही मोठ असल्याने ही जागा आम्हालाच मिळणार असा दावा भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलाय.

हिंगोलीत महाविकास आघाडीत निर्णय होईना...

हिंगोली लोकसभा मतदारसंघात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. महायुतीचा विचार केल्यास या ठिकाणी एकनाथ शिंदे गटाचे नेते हेमंत पाटील सध्या खासदार आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा शिंदे गटाकडेच असणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, महाविकास आघाडीत तीनही पक्षाने या मतदारसंघावर दावा केल्याने राजकीय वातावरण तापले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाच्या पदरात पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

MP List of Marathwada : मराठवाड्यातील सर्व आठही खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EVM Expert Exclusive :  ईव्हिएमचा संशयकल्लोळ; तज्ज्ञांचा शेरा काय ?Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी, एका दिवसात मार्केट कॅप 20 हजार कोटींनी वाढली,गुंतवणूकदार मालामाल
Adani Stocks : अदानी पोर्टसच्या शेअरमध्ये उसळी,गुंतवणूकदार मालामाल
Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
एकनाथ शिंदेच्या पाठिशी दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती; मुंबईतील नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
Shambhuraj Desai:'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
'मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचे वेगळे अर्थ काढाल तर..'शंभूराज देसाईंचा विरोधकांचा इशारा म्हणाले..
मोठी बातमी! विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला
विधीमंडळाचा गटनेता हाच महायुतीचा मुख्यमंत्री; भाजपच्या गटनेते निवडीचा मुहूर्तही ठरला! 
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्यकुमार यादवचीही बॅट तळपली,
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Embed widget