(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तर ठरलं! 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक
विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे हे आपल्या सभांमधून काय बोलणार हे पाहणं महत्वाचे असणार.
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला 24 डिसेंबर पर्यंत मुदत दिल्यानंतर, मनोज जरांगे तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला 15 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनोज जरांगेंनी आपल्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याचा वेळापत्रक जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप आणि टीका केल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्र दौरा करताना जरांगे हे आपल्या सभांमधून काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे.
मनोज जरांगे हे 15 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा राज्याचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात ते गावागावात सभा घेणार आहे. एकूण 6 टप्प्यात हा दौरा असणार आहे. या दौऱ्यात जरांगे हे ठाणे, पालघर, नाशिक, त्र्यंबकेश्वर,नेवासा, संगमनेर आणि श्रीरामपूर यासह अनेक ठिकाणी भेट देणार आहे. सोबतच 1 डिसेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावागावात साखळी उपोषण केले जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहे.
मनोज जरांगेंचा महाराष्ट्र दौरा (तिसरा टप्पा)
15 नोव्हेंबर 2023 (बुधवार)
सकाळी 11 वाजता : अंतरवाली सराटी
दुपारी 4.30 वाजता : वाशी
रात्री 7.30 वाजता : परांडा
16 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)
सकाळी 11 वाजता : करमाळा
दुपारी 5 वाजता : दौंड
17 नोव्हेंबर 2023 (शुक्रवार)
सकाळी 10 वाजता : मायणी
दुपारी 2 वाजता : सांगली
दुपारी 5 वाजता : कोल्हापूर
रात्री 8 वाजता : इस्लामपूर
18 नोव्हेंबर 2023 (शनिवार)
सकाळी 10 वाजता : कराड
दुपारी 1 वाजता : सातारा
दुपारी 4 वाजता : मेढा
रात्री 10 वाजता : वाई
19 नोव्हेंबर 2023 (रविवार)
सकाळी 9 ते 11 : पाचाड ते रायगड
रात्री 7 वाजता : रायगड-मुळशी-आळंदी
20 नोव्हेंबर 2023 (सोमवार)
सकाळी 9 वाजता: आळंदी
सकाळी 11 वाजता : तुळापूर
दुपारी 3 वाजता : पुणे
सायं. 6 वाजता : खालापूर
21 नोव्हेंबर 2023 (मंगळवार)
सकाळी 10 वाजता: कल्याण
दुपारी 3 वाजता : ठाणे
रात्री 8 वाजता : पालघर
22 नोव्हेंबर 2023 (बुधवार)
सकाळी 11 वाजता : त्रंबकेश्वर
दुपारी 3 वाजता : विश्रांतं
सायं. 6 वाजता : संगमनेर
23 नोव्हेंबर 2023 (गुरुवार)
सकाळी 10 वाजता : श्रीरामपूर
दुपारी 1 वाजता : नेवासा
दुपारी 5 वाजता : शेवगाव
सायं. 7 वाजता : धोंडराई
इतर महत्वाच्या बातम्या:
'मराठा समाजात जन्म झाला हा माझा गुन्हा आहे काय'?; विजेच्या तारांना पकडून तरुणाची आत्महत्या