Chhatrapati Sambhaji Nagar: धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 87 शाळा अनधिकृत, अशी ओळखा बोगस शाळा
Unauthorized School : शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या शाळांच्या व्यवस्थापन आपली दुकाने थाटून बसले आहेत.
Unauthorized School In Chhatrapati Sambhaji Nagar: राज्यातील 800 शाळा बोगस (School) असल्याचं शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यापैकी 100 शाळा कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, इतर शाळांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान अशात आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) देखील तब्बल 87 खासगी इंग्रजी शाळा (English School) बेकायदेशीरपणे सुरु असल्याचे समोर आले आहेत. शहरातील बीड बायपास, सातारा परिसर, हर्सूल,सावंगी, पडेगाव या परिसरात या शाळांची व्यवस्थापन आपली दुकाने थाटून बसले आहेत. 'सकाळ'ने याबाबत वृत्त दिले आहेत.
दरम्यान शिक्षण विभागाने काही महिन्यांपूर्वी अवैध शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात शाळांच्या संस्थाचालकांना पत्र पाठविले होते. त्यानंतर जिल्ह्यात सीबीएसई, आयसीएसईची मंडळाची मान्यता प्रस्तावित असल्याच्या एकूण 87 शाळा शहरात असल्याचे शिक्षण विभागाला आढळून आले होते. पुढे शिक्षण विभागाने केलेल्या चौकशीत यापैकी 18 शाळांकडे एनओसी, तर 17 शाळांकडे मान्यताच नाही, तसेच उर्वरित 52 शाळांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. मात्र असे असताना देखील नवीन शैक्षणिक वर्षासाठी या शाळांमध्ये भरमसाट शुल्क घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. धक्कादायक म्हणजे उघडपणे शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अशा शाळांवर शिक्षण विभागाकडून अद्याप एकही मोठी कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बोगस शाळा कशी ओळखणार!
- पालकांनी मुलांचे अॅडमिशन करताना शाळेकडे संबंधित बोर्ड आणि शासन मान्यतेची चौकशी करावी.
- तसेच संबंधित शाळेकडे शासनाने दिलेला मान्यता आदेश क्रमांक तपासून घ्यावा.
- शाळांनी सर्व माहिती शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दर्शनी भागात लावली आहे का? हे पालकांनी तपासून घ्यावे.
- मुलांचे अॅडमिशन करताना संबंधित शाळेच्या मान्यतेबाबत शंका असल्यास शिक्षण विभागाच्या कार्यालयात शाळेची चौकशी करून घ्यावी.
फलक लावण्याच्या सुचनेकडे नेहमीच दुर्लक्ष
खासगी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शासन मान्यता क्रमांकांचा फलक मोठ्या अक्षरात लावण्याबाबत शिक्षण विभागाकडून सतत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र असे असताना अनेक शाळा या सुचनांकडे दुर्लक्ष करतात. विशेष म्हणजे अनधिकृत असलेल्या शाळांकडे मान्यता क्रमांकच नसल्याने फलक लावण्याच्या सुचनेकडे नेहमीच दुर्लक्ष करताना सर्रास पाहायला मिळतात. विशेष म्हणजे अशा शाळांकडून नवीन शैक्षणिक वर्षासाठी बिनधास्त प्रवेश दिले जातात.
इतर महत्वाच्या बातम्या:
Bogus School List : तुमचं मूल बोगस शाळेत शिकत तर नाही ना? पाहा राज्यातील बोगस शाळांची यादी...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI