मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढा, संजय शिरसाट यांची मागणी
Sanjay Shirsat: याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
Sanjay Shirsat On Aurangzeb: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) नामांतराविरोधात सुरु असलेल्या उपोषणावरून आता राजकीय वातावरण अधिकच पेटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान यावरून प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं वक्तव्य केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) काढून टाका अशी मागणी शिरसाट यांनी केली आहे. तर याबाबत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी करणार असल्याचे शिरसाट म्हणाले आहे.
यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर झाल्याने याचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याचे काम करत आहे. शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. त्यामुळे याचं वाईट वाटायचं कारण काय आहे. औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. तसेच औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या येथे नको. त्यामुळे ही कबर काढून घ्यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली आहे.