Savarkar Gaurav Yatra : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा-शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रेचे आयोजन; अशी असणार संपूर्ण यात्रा
Chhatrapati Sambhaji Nagar शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar News : राज्यभरात भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. तर ही यात्रा 8 एप्रिल पर्यंत चालणार आहे. नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठवाडा मधील यात्रा प्रमुख संजय केणेकर व संभाजी पाटील निलंगेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान उद्यापासून छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) देखील भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील पश्चिम, पूर्व आणि मध्य विधानसभा मतदारसंघात ही यात्रा काढली जाणार आहे. यावेळी दोन्ही पक्षातील कार्यकर्ते मोठ्याप्रमाणावर सहभागी होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यामधून जाणार यात्रा...
दरम्यान राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघांतून सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत विविध ठिकाणी सहभागी होणार आहेत. ही गौरव यात्रा मराठवाड्यामधील सर्व लोकसभा क्षेत्र व सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये जाणार आहे. त्या विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी हे यात्रेचे प्रमुख असतील. यासाठी दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे या यात्रेत मोठ्याप्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील सावरकर गौरव यात्रा...
02 एप्रिल: स्वातंत्रवीर सावरकर चौक समर्थनगर येथुन सुरुवात होऊन, निराला बाजार मार्गे महात्मा फुले चौक, औरंगपुरा गुलमंडी मार्गे, उत्तम मिठाई भंडार भाटी बजार, पांदरीबा, अप्पाहलवाई मिठाई संस्थान गणपती मंदिर समारोप
03 एप्रिल: रेणुका माता मंदिर जास्ती जयस्वाल अहिल्याबाई होळकर चौक येथून सुरुवात होऊन, सुरेवाडी सूर्य वाडी मार्गे मयूर पार्क एसबीआय स्कूल, नवनाथ नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स, सौभाग्य मंगल कार्यालय, बाळासाहेब ठाकरे उद्यान, शारदा हॉटेल जिजाऊ चौक छत्रपती संभाजी महाराज पुतळा टीव्ही सेंटरला समारोप.
04 एप्रिल: बळीराम पाटिल चौकातून सुरवात होऊन, N8, N7, N6, N5, चीस्तिया चौक, अविष्कार चौक, बजरंग चौक, कॅनॉट प्लेसला समारोप
05 एप्रिल: सिडको बसस्टॅण्ड दिपाली हॉटेल येथुन सुरुवात, कामगार चौक, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिरापाशी समारोप
07 एप्रिल: नाईक नगर मंदिर चौक येथुन सुरुवात, दत्त मंदिर चौक, अय्यप्पा मंदिर चौक, रेणुका माता मंदिर चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, सातारा गाव खंडोबा मंदिर येथे समारोप
08 एप्रिल: नाईक नगर मंदिर चौक दत्त मंदिर चौक आय्याप्पा मंदिर चौक रेणुका माता मंदिर चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सातारा गाव खंडोबा मंदिर, अथर्व क्लासिक ते शिवराज कॉलनी मार्गे वाशी मंगल कार्यालय शिवाजीनगर, वाणी मंगल कार्यालय ते सूतगिरणी चौक, सूतगिरणी चौक ते जवाहर चौक नगर पोलिस स्टेशन मार्गे त्रिमूर्ती चौक, त्रिमूर्ती चौक मार्गे तानाजी चौक केदारकर हॉस्पिटल मार्गे रोपळेकर जवाहर चौक, एकता चौक मार्गे ज्योती नगर दशमेश नगर महादेव मंदिर, दशमेश नगर महादेव मंदिर ते उत्तम मंगल कार्यालय, उत्तम मंगल कार्यालय येथे गोपालटी मार्गे उस्मानपुरा राम मंदिर, राम मंदिर येथून बीटी मार्गे अहिल्याबाई होळकर चौक येथे समारोप होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :