एक्स्प्लोर

काय सांगता ! चक्क कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका, 2023 च्या परीक्षेत 2019 चाच पेपर; बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत गोंधळ

Chhatrapati Sambhaji Nagar : यापूर्वी 2019 मध्ये तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका 2023 च्या परीक्षेत जशाचतशी छापण्यात आली आहे. त्यामुळे यावर विध्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून,  2023 च्या परीक्षेत (Exam) चक्क 2019 चाच पुन्हा पेपर देण्यात आला आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा घेतली असून, राज्यभरात ही परीक्षा झाली आहे. मात्र याच परीक्षेत प्रश्नपत्रिकांचा वेगळाच गोंधळ समोर आला आहे. यापूर्वी 2019 मध्ये तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका 2023 च्या परीक्षेत जशाचतशी छापण्यात आली आहे. त्यामुळे यावर विध्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. 

राज्यभरात बार्टी, सारथी आणि महाज्योती या फेलोशिपसाठी राज्य सरकारने परीक्षा आयोजित केली आहे. मात्र, परीक्षा केंद्रात जाताच विध्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. कारण,  2019 च्या परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली प्रश्नपत्रिका पुन्हा 2023 च्या परीक्षेत विध्यार्थ्यांना देण्यात आली. विशेष म्हणजे 2019 च्या पेपरची जशाचतशी कॉपी करण्यात आली आहे. अगदी प्रश्न आणि प्रश्नांचा क्रम सुद्धा तोच आहे. 2019 मध्ये सेटसाठी जी परीक्षा घेण्यात आली होती, तोच पेपर 2023 च्या या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरण्यात आला आहे. आता यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या पेपरच्या माध्यमातून अभ्यास केला आहे, त्यांना या परीक्षेत पूर्णपैकी पूर्ण गुण मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.  

चक्क कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका 

मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या परीक्षांमध्ये सतत गोंधळ पाहायला मिळतोय. काही परीक्षेत प्रश्न चुकीचे असतात, तर काही ठिकाणी पर्याय चुकीचे दिल्याचे पाहायला मिळाले. अनकेदा अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न देखील विचारण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहे. मात्र,  बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेत चक्क कॉपी पेस्ट प्रश्नपत्रिका समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने नवा पेपर काढण्याचीही तसदी घेतली नाही. फक्त 2019 जुना पेपर कॉपी करून 2023 साठी पेस्ट करण्यात आलाय. आता खरंच या परीक्षेचा जो निकाल लागेल त्यातून गुणवत्ता पुढे येणार का? असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जातोय.

विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया...

अशी परीक्षा घेतली जाईल याबाबत सरकारने आम्हाला कोणतीही कल्पना दिली नव्हती. मात्र आज अचानक परीक्षा घेण्यात आली. यावेळी आम्हाला देण्यात आलेली प्रश्नपत्रिका सीलबंद नव्हती. तसेच आजच्या परीक्षेला देण्यात आलेली प्रश्नपत्रिका यापूर्वी म्हणजेच 2019 च्या सेट परीक्षेची असल्याचे आमच्या लक्षात आलं. 2019 चा पेपर जशाचतसा कॉपी-पेस्ट करून आम्हाला देण्यात आला. सरकार आमची गुणवत्ता तपासण्यासाठी ही परीक्षा घेत आहे. आम्ही सेट, नेट, गेट, पेट परीक्षा देऊनच इथपर्यंत पीएचडी परीक्षेसाठी आलो आहोत,असे विद्यार्थी म्हणाले. दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केल्याचे पाहायला मिळाले. तर, याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

D. Y. Patil College : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा MBA परीक्षेचा पेपर फुटला; विद्यापीठाकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhaskar Jadhav On Nana Patole : Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Embed widget