एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar: ऐन दिवाळीत छत्रपती संभाजीनगरात पाण्याचा ठणठणाट, मुख्य जलवाहिनी फुटली, भगदाड शोधायला 5 तास अन् दुरुस्तीला 15 तास

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटली. विशेष म्हणजे ही जलवाहिनी कुठे  फुटली हे शोधायला तब्बल 5 तास लागले.

Chhatrapati Sambhajinagar: ऐन दिवाळीच्या सणाच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहरात पाण्याचा ठणठणाट झाल्याचं दिसून आलंय. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी मध्यरात्री 2 वाजता फुटली. जलवाहिनीला पडलेले भगदाड शोधायला 5 तास तर दुरुस्त करायला 15 तास लागले. त्यामुळं ऐन दिवाळीत शहरातील नागरिकांची मोठीच गैरसोय झाल्याचे दिसत आहे. मनपाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आजचा दिवस जाऊ शकतो. त्यामुळे आज शहरवासीयांना पाणी मिळणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

जलवाहिनी फुटली, भगदाड शोधायला 5 तास!

छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी रात्री फुटली. विशेष म्हणजे ही जलवाहिनी कुठे  फुटली हे शोधायला तब्बल 5 तास लागले. सकाळी जायकवाडी धरणाजवळ पिंपळवाडी येथे फुटलेला भाग सापडला. त्यानंतर मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी 5 वाजता दुरुस्ती संपल्यावर शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. तब्बल 15 तास शहराचा पाणीपुरवठा बंद होता. वसुबारसच्या दिवशीच नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. मंगळवारी धनत्रयोदशीलासुद्धा पाणी मिळाले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

दुरुस्तीला लागले 15 तास:

जलवाहिनी फुटल्याचे सांगण्यात आल्यानंतर मनपाला जलवाहिनी कुठे फुटली आहे हे शोधायला तब्बल पाच तास लागले. तिथून पुढे दुरुस्तीचे काम सुरु झाले. जलवाहिनीला पडलेलं भगदाड दुरुस्त करण्यासाठी मनपाला 15 तास लागले. तोपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद होता. वसुबारस आणि धनत्रयोदशीदिवशी शहरवासियांना पाणीपुरवठा झाला नसल्यानं नागरिकांमध्ये रोष पसरला आहे. ऐन दिवाळीत मुख्य जलवाहिनी फुटल्यानं नागरिकांना पाण्याविना रहावे लागले.  यामुळे मोठीच गैरसोय ओढावल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला पैठणच्या नाथसागरातून पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा होणारी मुख्य जलवाहिनी पिंपळवाडी येथे फुटल्याचं सांगण्यात आले.

बुधवारी मिळणार नाही पाणी

जलवाहिनी फुटल्यानं शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी बुधवारचा दिवस लागू शकतो असं सांगण्यात येत आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी या दोन्ही दिवशी छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा ठप्प होता. आता आजही शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget