छत्रपती संभाजीनगरात 10 नव्हे 18 रुग्णांचा मृत्यू, 2 बालकांचाही समावेश; शरद पवारांकडून ट्वीट
Chhatrapati Sambhajinagar : बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीनगर : नांदेडच्या (Nanded) घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील घाटी रुग्णालयात मागील 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असतांना, हा आकडा आता 18 वर जाऊन पोहचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात तब्बल 18 जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मात्र, यावर प्रशासनाने स्पष्टीकरण देत औषधाच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचा दावा केला आहे. यामध्ये बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण बाहेरून रेफर केलेले होते किंवा मरणासन्न अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते अशी माहिती डीन संजय राठोड यांनी दिली आहे.
मागील 24 तासांत मृत्यू झालेल्या रुग्ण?
- गेल्या 24 तासात घाटी रुग्णालयातील एकूण मृत्यू संख्या 18 आहे.
- हृदय विकाराच्या झटक्याने 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
- निमोनियाने 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
- किडनी निकामी झाल्याने 3 जणांचा मृत्यू झाला.
- लिव्हर निकामी झाल्याने 1 मृत्यू झाला आहे.
- लिव्हर आणि किडनी दोन्ही निकामी झाल्याने 1 मृत्यू झाला.
- विष प्राशन केल्याने 1 मृत्यू झाला.
- रस्ता अपघातात 1 मृत्यू झाला.
- अपेंडिक्स पोटात फुटून पू झाल्याने 1 मृत्यू झाला.
- वजन कमी असल्याने प्रि मॅच्युअर 2 नवजात बालकांचे मृत्यू.
- ब्रॉडडेड 4 मृत्यू झाले आहे.
शासकीय घाटी रुग्णालयातील डीन संजय राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात रोज 10 ते 12 मृत्यू होत असतात. त्यामुळे या रुग्णालयात महिन्याकाठी सरासरी 300 रुग्ण दगावत असतात. दगवलेल्या रुग्णामध्ये बाहेरून खाजगी रुग्णालयात रेफर केलेले व उशिरा दाखल केलेले अधिक रुग्ण असतात. तर, औषध तुटवडा आणि डॉक्टर कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नसल्याचे राठोड यांनी म्हटले आहे.
शरद पवारांचे ट्वीट...
छत्रपती संभाजीनगरच्या घटनेवरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. "नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तितक्यातच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात 2 नवजात बालकांसह 8रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणारी आहे. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असून, सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली....,असे शरद पवार म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
“मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे....”; नांदेड प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर खोचक टीका