एक्स्प्लोर

'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा...'; बाबासाहेबांच्या नावानं अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री

14 April 2023 : सर्वसामान्यांना हा तारा मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे.

14 April 2023 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांची 14 एप्रिलला 132वी जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती म्हणजे, देशभरात मोठा उत्साह समजला जातो. भीमसैनिकांकडून महिनाभरापूर्वी वेगवेगळ्या उपक्रम राबवण्यासाठी नियोजन केले जाते. मात्र यंदाची बाबासाहेबांची जयंती हटके आणि ऐतिहासिक ठरणार आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकाशातील एका ताऱ्याच रजिस्ट्री करण्यात आली आहे. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं नामकरण होणार आहे. तर सर्वसामान्यांना हा तारा मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर पाहता येणार आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजू शिंदे यांनी या ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे.

अमेरिकेत अवकाशातील ताऱ्यांची रजिस्ट्री करणारी 'इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्री' नावाची एक संस्था असून, या संस्थेमार्फत अवकाशातील ताऱ्यांना व्यक्तींची नावं देण्यात येतात. यासाठी भारतीय चलनात नऊ हजार रुपये शुल्क भरावे लागते. यंदाची बाबासाहेबांची जयंती आगळीवेगळी व्हावी म्हणून राजू शिंदे यांनी, या संस्थेकडे बाबासाहेबांच्या नावे ताऱ्याची नोंद करण्यासाठी अर्ज केला होता. शिंदे यांनी 9 फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता आणि आता त्यांना त्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाले. तर 14 एप्रिलला या ताऱ्याचं लाँचिंग होणार असून, https:// space-registry.org या स्पेस रजिस्ट्री ॲपच्या संकेतस्थळावरून हा तारा पाहता येऊ शकतो. तसेच मोबाइल, लॅपटॉप, संगणक, टॅबवर हा तारा पाहता येणार आहे. 

जब तक सूरज चाँद रहेगा,बाबा तेरा नाम रहेंगा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गावागावात बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने रॅली काढली जाते. मात्र यावेळी 'जब तक सूरज चाँद रहेगा, बाबा तेरा नाम रहेंगा' अशी घोषणा दिली जाते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अंत्ययात्रेत देखील ही घोषणा देण्यात आली होती. त्यामुळे ही घोषणा लक्षात घेता राजू शिंदे यांनी बाबासाहेबांच्या नावाने अवकाशातील ताऱ्याची रजिस्ट्री केली आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारे कोणालाही आपल्या नातेवाइकांचा किंवा स्वतःचं नाव या ताऱ्याला देता येत नाही. यासाठी नाव दिले जाणाऱ्या व्यक्तीचे खूप व्यापक काम असायला हवं, त्यासाठी संबंधित संस्थेकडून विविध कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यामुळे तब्बल दीड महिन्यापासून प्रक्रिया करत आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यावर  अखेर आकाशातील तार्‍याला बाबासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं राजू शिंदे म्हणाले.

महत्वाच्या इतर बातम्या : 

"हा जयंतीचा कार्यक्रम, प्रचाराचा नाही"; केंद्रीय मंत्री कराडांना आमदारानं भाषणापासून रोखलं, खैरेंना टाळ्या वाजवण्यासही मज्जाव

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Embed widget