(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवकाळी पावसामुळे राज्यातील दोन लाख हेक्टरवरील पिकांची माती; नुकसानीचे पंचनामे पूर्ण
Unseasonal Rain Damage : राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain Damage : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर फळबागांचे देखील नुकसान झाले. तर राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. दरम्यान, या क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, नुकसानभरपाईसंदर्भात जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. त्यामुळे आता नुकसानभरपाई कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून ऑनलाईन माहिती अपलोड करण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागला आहे. त्यामुळे अशीच काही परिस्थिती आता अवकाळीच्या नुकसानभरपाई बाबत होऊ नयेत अशी मागणी शेतकरी करत आहेत.
आधी झालेल्या अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांना मार्च महिन्यात देखील दोनदा अवकाळी पावसाचा सामना करावा लागला. ज्यात 4 ते 9 मार्च आणि 15 ते 21 मार्च या कालावधीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यामुळे कडधान्य, फळ पिके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, इत्यादी पिकांचे नुकसान झाले. तर राज्यभरातील 1 लाख 99 हजार 486 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. तर या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात आले आहे.
सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात
मराठवाड्यात 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान 11 लाख 7 हजार 5 शेतकऱ्यांचं 60 हजार 258 हेक्टरवर नुकसान झाले आहेत. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, 23 हजार 821 हेक्टरवरील पिकांची माती झाली आहे. तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना या जिल्ह्यात देखील मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहेत. तर मराठवाड्यातील 99 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामुळे आता नुकसानभरपाई कधी मिळणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर याकडे शेतकरी नजरा लावून बसले आहे.
राज्यातील नुकसान आकडेवारी....
अ.क्र. | जिल्ह्याचे नाव | नुकसान आकडेवारी |
1 | ठाणे | 398 |
2 | पालघर | 4,377 |
3 | रायगड | 598 |
4 | सिंधुदुर्ग | 43 |
5 | नाशिक | 11,875 |
6 | धुळे | 9,522 |
7 | नंदुरबार | 3,052 |
8 | जळगाव | 11,491 |
9 | अहमदनगर | 12,198 |
10 | पुणे | 579 |
11 | सोलापूर | 3,977 |
12 | सातारा | 484 |
13 | सांगली | 1 |
14 | छत्रपती संभाजीनगर | 23,914 |
15 | बीड | 16,942 |
16 | जालना | 15,080 |
17 | परभणी | 6,812 |
18 | हिंगोली | 5,604 |
19 | लातूर | 11,795 |
20 | नांदेड | 23,821 |
21 | धाराशिव | 1,526 |
22 | बुलडाणा | 3,147 |
23 | वाशीम | 4,981 |
24 | अमरावती | 9,058 |
25 | यवतमाळ | 6,539 |
26 | अकोला | 3,562 |
27 | वर्धा | 86 |
28 | गोंदिया | 142 |
29 | भंडारा | 227 |
30 | चंद्रपुर | 221 |
31 | गडचिरोली | 246 |
32 | नागपूर | 7,188 |
महत्वाच्या इतर बातम्या :