संभाजीनगर लोकसभा भाजप की शिवसेनेकडे?; दोनही पक्षाचे नेते म्हणतात आमचीच जागा...
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून भाजप आणि शिवसेनेत वाद दिसून येत आहे. दोन्ही पक्षाचे नेते या मतदारसंघावर दावा करत आहेत.
Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीत देखील जागावाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याच पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत एकाच मतदारसंघावर दोन पक्षांकडून दावा केला जात असल्याने युतीमधील संघर्ष पाहायला मिळत आहे. अशात आता छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून देखील भाजप आणि शिवसेनेत वाद दिसून येत आहे. एकीकडे अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी संभाजीनगरमधील जाहीर सभेत या मतदारसंघावर दावा केला असतानाच, दुसरीकडे शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील याच मतदारसंघावर सेनेचा दावा केला आहे.
संभाजीनगरमधून भाजपने निवडणूक लढवावी : भागवत कराड
दरम्यान यावर बोलतांना भागवत कराड म्हणाले की, “छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याचा निर्णय लवकरच होईल. तर, कमळाला उमेदवारी मिळावी हे माझं व्यक्तिगत मत आहे. माझी कित्येक वर्षांपासून इच्छा आहे की, ही जागा कमळाला मिळावी आणि मी येथून निवडणूक लढवावी. या वाक्यांन युतीत अस्वस्थता होणार नाही. आम्हाला आमच्या नेत्याचा आदेश आहेत. आम्ही सगळे बरोबर आहोत. लोकांनी संभाजीनगरला भरभरून मत दिले आहेत. हिंदुत्व हा इथला प्रचाराचा अंश आहे. निजामाला टक्कर शिवाजी महाराजांनी आणि सरदार वल्लभाई यांनी दिली. त्याच धर्तीवर अमित शहा देशभर फिरत असल्याचे भागवत कराड म्हणाले आहेत.
संभाजीनगर शिवसेनेचा मतदारसंघ : भुमरे
संभाजीनगर शहरातून मजलीसला हटवून मोदींना कमळ पाठवाल का? हा प्रश्न अमित शहा यांनी जाहीर सभेतून विचारून छत्रपती संभाजीनगरची जागा ही भाजपाच लढवणार असल्याचं अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे. पारंपारिक युतीमध्ये ही जागा शिवसेनेला आहे, मात्र आता या ठिकाणी भाजप उमेदार देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण यावर बोलतांना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे म्हणाले की, “केवळ सभा झाली म्हणून ही जागा भाजपा लढवेल असं नाही. तर ही जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे येथून शिवसेना निवडणूक लढवेल असेही संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे.
भाजपकडून उमेदवार कोण असणार?
आगामी लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपने मागील दोन वर्षांपासून तयारी सुरु केली आहे. त्यातच महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडेच असणार असल्याचा अप्रत्यक्षपणे अमित शाहांनी आपल्या भाषणातून उल्लेख केला आहे. पण या संभाजीनगरमधून भाजपचा उमेदवार कोण असणार अशीही चर्चा आहे. तर, केंद्रीय मंत्री भागवत कराड, अतुल सावे यांच्यासह मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा असून, ऐनवेळी नवीन चेहरा देखील दिला जाण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाकडून भुमरेंच्या नावाची चर्चा?
भाजप-शिवसेना युतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ नेहमी शिवसेनेलाच मिळाला आहे. तर, यंदाही हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, शिंदे गटाकडून लोकसभेसाठी उमेदवार कोण असणार याचा विचार केल्यास पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या नावाची चर्चा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :