एक्स्प्लोर

संपूर्ण आंबे विकत घेण्याची थाप मारून फळ विक्रेत्या महिलेची फसवणूक; तब्बल 89 हजाराला लावला चुना

Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar  City) एक आगळीवेगळी घटना समोर आली असून, चक्क एका आंबे विक्रेत्या महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ज्यात गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयाचे कानातील टॉप्स, 10 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या तर 4 हजार रुपये रोख असा एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीने लंपास केला आहे. तर या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, साहेबांना आंबे आवडतात तुझ्या टोपलीतील सर्व आंबे साहेब विकल घेतील अशी थाप मारत एकाने आंबे विक्रेत्या महिलेला मोटरसायकलवर बसविले. तिला झाल्टा फाट्यावर नेत लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती शेंद्रा एमआयडीसी भागातील टाकळी रोडवरील पेट्रोल पंपाच्या कच्च्या रस्त्याने डोक्यावर टोपली घेऊन आंबे घेऊन जात होती. 

दरम्यान याचवेळी एक 35 वर्षाचा अनोळखी इसम मोटरसायकल वर बसून तिथे आला. माझ्या साहेबांना गावरान आंबे खूप आवडतात, तू आंब्याचे टोपले घेऊन माझ्या गाडीवर बस. मी तुला साहेबांकडे घेऊन जातो असे म्हणाला. तसेच तुझे सगळे आंबे विकत घेतील, अशी थाप मारली. आरोपीवर विश्वास ठेवून महिला मोटरसायकलवर बसली. आरोपीने मात्र झाल्टा फाट्यावर गेल्यावर खरे रंग दाखविले. 

जीवे मारण्याची धमकी देऊन लुटले... 

झाल्टा फाट्यावर गेल्यावर दुचाकीस्वाराने तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र कानातील टॉप्स व हातातील चांदीच्या पाटल्या काढ नाहीतर तुला जिवंत मारून टाकेन अशी धमकी दिली. महिलेच्या गळ्यातील 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 50 हजार रुपयाचे कानातील टॉप्स, 10 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या तर 4 हजार रुपये रोख असा एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीने लंपास केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सिडको एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत. 

विश्वास ठेवणं महागात पडले... 

तक्रारदार महिला आंबे विकून उदरनिर्वाह करते.  8 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ती शेंद्रा एमआयडीसी भागातील टाकळी रोडवरील पेट्रोल पंपाच्या कच्च्या रस्त्याने डोक्यावर टोपली घेऊन आंबे घेऊन जात होती. याचवेळी तिथे अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला आणि सर्व आंबे विकत घेण्याची थाप मारली. तर आपली सर्व आंबे एकाचवेळी विकून जाईल या अपेक्षेने महिलेने देखील तिच्यावर विश्वास ठेवला. पण विश्वास ठेवणं महिलेला महागात पडले आणि तिची फसवणूक झाली. सोबतच  एकूण 89 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरीलाही गेला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

जुगार अड्डे बंद करण्याच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करणाऱ्यावर चक्क विनयभंगाचा गुन्हा; संभाजीनगर पोलिसांचा 'हम करो सो कायदा'?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
Ajit Pawar: अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
Nashik : नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सVijay Wadettiwar : हे सरकार महाराष्ट्राला कंगाल करून सोडेल - विजय वडेट्टीवार9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :11 ऑक्टोबर 2024 : ABP MAJHAPune Hit and Run : पुण्यात पुन्हा हिट अँड रन; आलिशान कारची 2 दुचाकींना धडक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
विधानसभेच्या तोंडावर राज ठाकरेंचा मविआला पहिला धक्का, पाच टर्म खासदारकी गाजवणाऱ्या नेत्याच्या मुलाचा काँग्रेसला रामराम
Ajit Pawar: अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
अजित पवारांच्या अर्थखात्याची शिस्त बिघडवली, महायुतीच्या नेत्यांकडून अजितदादांनाही बाजूला सारण्याचे प्रयत्न: विजय वडेट्टीवार
Pune Car Accident: कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
कोरेगावच्या गुगल बिल्डिंगसमोर हीट अँड रन! आलिशान कारनं दोन दुचाकीस्वारांना उडवलं, एकाचा मृत्यू, 3 जखमी
Nashik : नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
नाशकात उभारली प्रभू श्रीरामाची 70 फुटी मूर्ती, पाहा डोळ्यांचे पारणे फेडणारे PHOTOS
Pune Crime: लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
लॉजमध्ये नेऊन प्रेयसीवर सपासप वार, प्रियकराने स्वत:ही गळफास घेतला; पिंपरी-चिंचवड हादरलं
PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मुदतवाढ,  80 कोटी लाभार्थ्यांना फायदा, मोफत तांदूळ कधीपर्यंत मिळणार?
मोदी सरकारनं पीएम गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवली, मोफत अन्नधान्य मिळण्याचा मार्ग मोकळा
Maharashtra Assembly Election 2024 : संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
संजय राठोडांविरोधात ठाकरे गट 'बंजारा कार्ड' खेळणार? 'या' महंतांनी ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Ram Shinde vs Rohit Pawar : 'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
'माझ्या लूकवर बोलण्यापेक्षा मतदारसंघात पाच वर्ष काय केलं ते सांगा', राम शिंदेंचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
Embed widget