हॉटेल चालक म्हणावं की गुंड...; पोलिसांच्या कारवाईत चक्क गावठी कट्टा व कोयता लागला हाती
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) ग्रामीण पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत हॉटेल चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. एकोड पाचोड रोड वरती खडी क्रेशरच्या पुढे असलेल्या हॉटेल जंगदवाचा मालक सुनिल वैजिनाथ्ज्ञ चंदने (वय 27 वर्षे रा. आपतगाव ता.जि. छत्रपती संभाजीनगर) हा स्वतः कडे एक गावठी कट्टा बेकायदेशिर व अवैधरित्या बाळगत असल्याची माहिती खांडेकर यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या हॉटेल चालकाला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे चिकलठाणा पोलिसांनी एकोड पाचोड रोडवरती खडी क्रॅशरच्या पुढे असलेल्या हॉटेल जंगदबा येथे सापळा लावला होता. यावेळी हॉटेल मालक सुनिल वैजिनाथ चंदने हा हॉटेलमध्येच असताना पथकांने त्याच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन होते. त्यानंतर त्याच्यावर अचानक झडप घालुन त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याला अनाधिकृतपणे स्वतःजवळ बाळगत असलेल्या गावठी कट्टया बाबत विचारपुस केली असता, त्याने पोलीसांना सहकार्य न करता उडवा उडवीची उत्तरे दिली. यावरून त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्याला विश्वासात घेऊन कसोशिने विचारपुस करताच त्यांने त्याच्या हॉटेल जंगदवाच्या पत्र्याचे शेडच्या पाठीमागे जमिनीत खड्डा करून त्यात पुरुण लपवुन ठेवलेला गावढी कट्टा व एक कोयता हा पोलीसांना काढुन दिला आहे.
हॉटेल चालक आरोपीला अटक...
अवैधरित्या विनापरवाना स्वतः जवळ बाळगत असलेला गावठी कट्टा व कोयता हा पोलीसांनी जप्त करून आरोपी नामे सुनिल वैजिनाथ चंदने याच्याविरूध्द पोलीस ठाणे चिकलठाणा येथे गुन्हा दाखल केला आहे. भारतीय हत्यार कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच चंदनेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रविंद्र खांडेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, रवि साळवे, दिपक देशमुख, अजित शेकडे, सतिष देतकर, भारती राठोड, गणेश कोरडे यांनी केली आहे.
हॉटेलात जेवण करणाऱ्यावर शस्त्राने वार
दुसऱ्या एका घटनेत हॉटेलात जेवण करत असलेल्या एकाला तुझी गाडी आम्ही आणली आहे आमच्या सोबत चल असे म्हणत सोबत नेऊन शस्त्राने वार करून जखमी करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हि घटना 5 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास हर्सूल भागात घडली. समाधान विश्वनाथ तायडे (वय 41, रा. मयुरपार्क, ऑडिटर सोसायटी) हे एका हॉटेलात जेवण करीत होते. तेव्हा आरोपी राहुल बाबासाहेब सोनवणे, सुनील केंद्रे आणि आणखी एकजण तिथे आले. त्यांनी तुझी गाडी आम्ही आणली आहे. सोबत चल तुला दाखवतो असे म्हणत शिविगाळ करून मारहाण केली. तसेच शस्त्राने डाव्या-उजव्या दंडावर, डोळ्याच्या खाली, छातीवर मारून जखमी केले. याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: