(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chhatrapati Sambhajinagar : समृद्धी महामार्गावरील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, लेकरांसमोर आई-वडिलांनी सोडले प्राण
Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या भाविकांची स्विफ्ट कार आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) झालेल्या भीषण अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे. शिर्डीला साईबाबांचे दर्शन करून शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या भाविकांची स्विफ्ट कार आणि ट्रकच्या धडकेत तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात 8 मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगावजवळील पथकर नाक्याजवळ झाला. ज्यात अनिल किसन राठोड (वय 35 वर्षे), भाग्यश्री अनिल राठोड (वय 32 वर्षे), रोहन सुनील राठोड (12 वर्षे, सर्व रा. पळशी तांडा नंबर 2, ता. जि. औरंगाबाद) असे मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात असलेली स्विफ्ट कार (एमएच 14 एफसी 5387) ही मालवाहू ट्रक (एमएच 18 बीजी 7702) ला पाठीमागून जोरात धडकली. या भीषण अपघातात चालक अनिल राठोड, त्यांची पत्नी भाग्यश्री राठोड आणि रोहित राठोड या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आदित्य अनिल राठोड (वय वय 12 वर्षे), लावण्या अनिल राठोड (वय 10 वर्षे) हे जखमी झाले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चुराडा झाला आहे.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकातील जवान सुरेश जाधव, रामेश्वर गांगुर्डे, संजय लोहार महामार्ग गस्त पथकाचे अक्षय तरडे, संदीप कारले, नीलेश पारटे, भाऊसाहेब डमाळे, भगवान उगले व रुग्णवाहिका चालक फियान शेख, डॉ. बागुल पाटील यांनी अपघातस्थळी येऊन जखमींना रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. घटना घडताच ट्रकचालक पसार झाला. या प्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सपोनि. मनोज पाटील करत आहेत.
अपघातास्थळी भयानक परिस्थिती...
शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे समृद्धी महामार्गाने जाणाऱ्या भाविकांची स्विफ्ट कार आणि ट्रकच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच संबधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. मात्र हा अपघात एवढा भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी सर्वत्र रक्ताचा सडा पाहायला मिळत होता. तर जखमी झालेल्या मुलांसमोर आपल्या आई वडिलांचा मृतदेह पडलेला असल्याने त्यांना रडू कोसळले. तर दोन्ही मुलं प्रचंड घाबरून गेले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना धीर देत नातेवाईकांना याबाबत माहिती दिली.
इतर महत्वाच्या बातम्या: