एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: मलब्याचा ढिगारा ढासळल्याने पाच मजूर दबले, तिघांचा मृत्यू; छ. संभाजीनगरमधील घटना

Chhatrapati Sambhaji Nagar : ही घटना सोमवारी (4 एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोलेगाव शिवारात घडली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली असून, विहिरीचे काम सुरु असताना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून तीन परप्रांतीय मजुरांचा जीव गेला आहे. तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (3 एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोलेगाव शिवारात घडली आहे. तर मृत आणि जखमी मजूर हे राजस्थान येथील रहिवासी आहेत. सीताराम रावत (वय 35 वर्षे), महावीर रावत (वय 38 वर्षे), बनाजी गुज्जर (वय 35 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, छोटू भिल्ल (वय 25 वर्षे) आणि रतनसिंग रावत (सर्व, भिलवाडा, राजस्थान) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारातील येथील साहेबराव करंडे यांच्या याच शेतामध्ये विहिरीचे काम सुरु होते. विहिरीचे काम जवळपास 25 फूट म्हणजेच चार परसापर्यंत झाले होते. काम सुरु असताना विहिरीचा मलबा लगतच टाकण्यात आला होता. या ठिकाणी राजस्थान येथील मजूर काम करत होते. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीत मजूर काम करत असताना, विहिरीलगत असलेली मलब्याचा ढिगारा अचानक ढासळून तो विहिरीत पडला. 

पोलीस घटनास्थळी दाखल

त्याचवेळी विहिरीत काम करत असलेले पाचही मजूर मलब्याखाली दबले गेले. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिऊर नागरिकांना माहिती कळवली. त्यामुळे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तर याची माहिती शिऊर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

तिघेही मृतावस्थेत आढळून आले

दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मजुरांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरु करण्यात झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. साधारणतः दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर छोटू भिल्ल आणि रतनसिंग रावत या दबलेल्या दोन मजुरांना जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात यश आले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारार्थ शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर जेसीबी यंत्राच्या सहाय्याने अन्य तीन मजुरांचा शोध घेण्याचे काम सुरु करण्यात आले. विहिरीत अख्खी मलब्याची थप्पी ढासळल्याने शोधकार्यात अनेक अडथळे निर्माण होत होते. दरम्यान रात्री 8 वाजता सीताराम रावत, महावीर रावत आणि बनाजी गुज्जर या तीन मजुरांचा शोध लागला, परंतु ते तिघेही मृतावस्थेत आढळून आले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

काय सांगता! तीनशे रुपयात मिळतो पेपर लिहून, छत्रपती संभाजीनगरमध्ये भरतोय शिक्षणाचा बाजार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
Raj Thackeray: संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Desai On Aaditya Thackeray Speech : दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे पहिल्यांदा भाषण करणारSuraj Chavan Meet Ajit Pawar : बिग बॉस विजेता सूरज चव्हाणने घेतली अजित पवार यांच्या भेटीलाABP Majha Headlines : 5 PM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde Shiv Sena Dasara Melava 2024 : आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2024 | शनिवार
Raj Thackeray: संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
संघाच्या कामाने मला अचंबित केलंय, एखाद्या संघटनेने 100 वर्षे काम करणं सोपं नाही: राज ठाकरे
Samarjeetsinh Ghatge on Hasan Mushrif : निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
निष्ठा विकल्याने झोप येत नाही, कागलचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतला; समरजित घाटगेंचा हसन मुश्रीफांवर जोरदार पलटवार
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Video : बिग बॉसने तुला कसं बोलवलं?; अजित पवारांचे बरेच प्रश्न, सूरजचं उत्तर ऐकून दादा पोट धरुन हसले
Konkan Sea Bridge: विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी कोकणातील 7 पूलांचे भूमिपूजन, 8000 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
Congress Action: अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या चर्चा असलेल्या 'त्या' आमदारावर काँग्रेसची कारवाई! सहा वर्षांसाठी केलं निलंबित, काय आहे प्रकरण?
Dasara Melava 2024 : भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
भगवानगडावर पंकजा मुंडे की नारायण गडावर मनोज जरांगे पाटील? कोणाच्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी?
Nashik Crime : हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
हत्याराचा धाक दाखवून मित्राला बेदम मारहाण, वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात कोयत्याने केला वार, नाशिकमध्ये खळबळ
Embed widget