डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला गालबोट; सामूहिकरित्या पदवी वाटप केल्याने विद्यार्थी आक्रमक
Chhatrapati Sambhaji Nagar : शेवटी विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन, विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप केल्याने वादावर पडदा पडला.
Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज दीक्षांत समारंभ पार पडला. मात्र याच दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे पाहायला मिळाले. कारण सामूहिकरित्या पदवी वाटप केल्याने विद्यार्थी आक्रमक झाले. तर कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप करण्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी हॉलमध्येच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. शेवटी विद्यापीठ प्रशासनाने नरमाईची भूमिका घेऊन, विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप केल्याने वादावर पडदा पडला. मात्र या घटनेची विद्यापीठ परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभाला राज्यपाल येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाला आणि त्यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांना पदविका वाटप करण्यात आल्या. मात्र प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप न करता सामूहिकरित्या पदव्या देण्यात आल्या. त्यामुळे प्रमुख पाहुण्यांच्याच हस्ते पदविका मिळाव्या असा विद्यार्थ्यांनी आग्रह धरला. पाहता-पाहता विद्यार्थ्यांचा संताप वाढला. तर संतत्प झालेल्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ सुरु केला. अशा पद्धतीने जर डिग्री हातात द्यायच्या होत्या तर या ठिकाणी बोलावलं कशाला असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. घोषणाबाजी सुरु झाल्याने विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम आटोपता घेतला. मात्र यामुळे विद्यार्थी आणखीनच आक्रमक झाले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातला. विद्यापीठ प्रशासनाने कार्यक्रम आटोपता घेतल्याने विद्यार्थी आणखीनच आक्रमक झाले. त्यामुळे शेवटी परत गेलेले कुलगुरू आणि प्रमुख पाहुणे पुन्हा एकदा हॉलमध्ये आले. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पदवी वाटप करण्यात आल्या. त्यानंतर कार्यक्रम संपला. पण पदवी वाटपावरून झालेल्या गोंधळामुळे 63 वा हा दीक्षांत समारंभ चांगलाच गाजला.
असा पार पडला कार्यक्रम...
'एआययू'च्या महासचिव डॉ. पंकज मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळ्याला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 व मार्च-एप्रिल 2022 या परीक्षेतील पदवीधारकांना पदव्या वाटप करण्यात आले. ज्यात एकूण 60 हजार पदवी व पदव्युत्तर पदवीधारकांना पदव्या वाटप करण्यात आल्या. ज्यात सोहळ्यात 291 संशोधकांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद सदस्य उपस्थित होते. यावेळी दीक्षांत सोहळ्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संकेतस्थळ, फेसबुक पेज तसेच यूट्यूब अकाउंटवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI