एक्स्प्लोर

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सत्ताधारी पक्षात सहभागी होणार?; भाजप आमदाराचं मोठं वक्तव्य

Haribhau Bagde : भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह 16 आममदारांबाबत अपात्र की पात्र याबाबतचा निकाल येण्यासाठी अवघ्या काही तासांचा वेळ शिल्लक आहे. असे असतानाच भाजपचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. "विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय" असे वक्तव्य बागडे यांनी केले आहे. त्यांच्या याच वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) सत्ताधारी पक्षात सहभागी होणार का?, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) माध्यमांशी बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

सोमवारी छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील बैठकीत उपस्थित होते. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणाऱ्या दानवेंनी या बैठकीत नरमाईची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. यावरूनच भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी अंबादास दानवे यांना जोरदार टोला लगावला. "दानवेंचा बैठकीतील नूर हा प्रेमाचा होता व सत्ताधाऱ्यांच्या बाजूने होता. विरोधी पक्षनेत्याने सत्ताधाऱ्यांसोबत जाण्याची परंपरा आहे, त्यामुळे काहीतरी शिजतंय," असे बागडे म्हणाले. 

दानवेंचा बागडे यांच्यावर हल्लाबोल 

याच बैठकीत दानवे यांनी देखील बागडे यांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले आहेत. बैठकीत सत्ताधारी बागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ लोकप्रतिनिधीचे चार-चार वर्षे काम होत नसल्याची टीका दानवे यांनी केली. बागडे ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांची कामे वर्षानुवर्षे होत नसतील तर बाकीच्यांचे काय? असेही दानवे म्हणाले. दानवे यांच्या याच टोलेबाजीनंतर बागडे यांनी बैठक संपल्यावर माध्यमांशी बोलतांना दानवेंच्या नरमाईची भूमिकेचा 'बॉम्ब' टाकला. 

पहिल्यांदा एवढा मोठा पोलीस बंदोबस्त...

मागच्या जिल्हा नियोजन बैठकीत अंबादास दानवे आणि संदिपान भुमरे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. तर, दानवे हे भुमरे यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे कालच्या बैठकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आतापर्यंतच्या जिल्हा नियोजन बैठकीत पहिल्यांदाच एवढा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत असल्याचे अनेक लोकप्रतिनिधी म्हणाले. विशेष म्हणजे बैठकी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांची पोलिसांना यादी देण्यात आली होती. यादीत नावं असलेल्या लोकांनाच आतमध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे कालची जिल्हा नियोजन समिती अनेक कारणांनी चर्चेत आली. 

व्हिडिओ: दानवे प्रेमाच्या सुरात होते, काही शिजतंय का? हरिभाऊ बागडेंचं सूचक वक्तव्य

इतर महत्वाच्या बातम्या: 

जमीन गैरव्यवहारावरून संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली; दानवे, जलील, बागडे आक्रमक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Embed widget