एक्स्प्लोर

Chandrapur : चंद्रपूर महापौरपदाच्या वादावर दिल्लीत तोडगा, प्रतिभा धानोरकर गट वरचढ; एकमेकांच्या कामात लुडबुड नको, हाकमांडचा आदेश

Chandrapur Election :  महापौरपद जरी धानोरकर गटाला दिलं असलं तरी विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौर आणि गटनेतेपद देण्यात आलं आहे. स्थायी समिती सभापतीपदाचंही निश्चित करण्यात आलं आहे. 

नवी दिल्ली : राज्याचं लक्ष लागलेल्या चंद्रपूर महापालिका महापौरपदासाठी अखेर दिल्लीत तोडगा निघाला आहे. यामध्ये खासदार प्रतिभा धानोरकरांच्या गटाला महापौरपद तर विजय वडेट्टीवार गटाला उपमहापौरपद देण्याचा निर्णय झाला. तर जो गट सोबत येईल त्यांना स्थायी समिती सभापतीपद देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज असल्याने त्याची जमावाजमव करण्याची जबाबदारी ही धानोरकरांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. 

चंद्रपुरात काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असल्या तरी विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामधील वादामुळे महापौरपदाचा तोडगा निघत नव्हता. शेवटी विजय वडेट्टीवारांनी त्यांच्या 18 समर्थक नगरसेवकांसह दिल्ली गाठली. 

नवी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते के सी वेणूगोपाल यांच्या निवासस्थानी विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनिल केदार, खासदार श्यामकुमार बर्वे यांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये महापौरपदाच्या वादावर तोडगा निघाला. 

धानोरकरांच्या गटाला महापौरपद

चंद्रपूरचे महापौरपद हे धानोरकर गटाकडे तर उपमहापौर हे विजय वडेट्टीवार गटाकडे देण्याचं निश्चित झालं. महापालिकेतील गटनेतेपद हे विजय वडेट्टीवार गटाला देण्याच ठरले. तर जो पक्ष काँग्रेसला पाठिंबा देणार त्याला स्थायी समिती सभापतीपद द्यायचं निश्चित करण्यात आलं.

चंद्रपुरात काँग्रेसला बहुमतासाठी अद्याप चार नगरसेवकांची गरज आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 तर वंचित बहुजन आघाडीकडे दोन नगरसेवक आहेत. त्यामुळे उर्वरित चार नगरसेवकांची जमवाजमव ही प्रतिभा धानोरकरांनी करायची आहे. 

एकमेकांच्या मतदारसंघात लुडबुड नको

चंद्रपुरच्या का महापौर पदावरून सुरू असलेल्या वादामुळे दिल्लीत हाय पॉवर शक्तिप्रदर्शन करण्यात आले. त्यावर तोडगा निघाला असला तरी काँग्रेस हायकमांडने काही सूचनाही दिल्या आहेत. यापुढे एकमेकांच्या मतदारसंघामध्ये लुडबुड करू नका अशा सूचना काँग्रेस हायकमांडने धानोरकर आणि वडेट्टीवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दुसरीकडे ठाकरे गटाकडूनही महापौरपदावर दावा केला आहे. आपल्याला काँग्रेस आणि भाजपची दारे खुली असून जो महापौरपदासाठी आपल्याला पाठिंबा देईल त्याच्यासोबत आम्ही जाऊ असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. 

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)

एकूण नगरसेवक 66 

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

भाजप – 23

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
धक्कादायक! संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानेच काढला लहान भावाचा काटा, हल्ल्यात भावाची पत्नीही गंभीर जखमी, चंद्रपूर हादरलं
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
चंद्रपुरात भीषण अपघात, भात लावणीसाठी गेलेल्या शेतजमुरांचे वाहन पलटी; 4 ठार 27 जखमी, कुटुंबीयांचा आक्रोश
Chandrapur Crime News: ज्याला पोटच्या मुलासारखं सांभाळलं, त्यानेच 5 कोटी लुटले! राजुराच्या दिवंगत माजी आमदारांच्या पत्नीची हृदयद्रावक कहाणी
ज्याला पोटच्या मुलासारखं सांभाळलं, त्यानेच 5 कोटी लुटले! राजुराच्या दिवंगत माजी आमदारांच्या पत्नीची हृदयद्रावक कहाणी

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Embed widget