Chandrapur Election : किशोर जोरगेवारांची पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती, चंद्रपुरात भाजपचं डॅमेज कंट्रोल
Kishor Jorgewar vs Sudhir Mungantiwar : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील अंतर्गत संघर्षाचा परिणाम महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रपूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर Chandrapur Municipal Election) चंद्रपुरात सुरू असलेल्या नाराजीनाट्यानंतर भाजपनं डॅमेज कंट्रोल केल्याचं दिसतंय. चंद्रपूर महापालिका निवडणूक ही आमदार मुनगंटीवारांच्या (Sudhir Mungantiwar) नेतृत्वाखाली होणार आहे. तर त्यांच्या अंतर्गत विरोधक समजल्या जाणाऱ्या किशोर जोरगेवारांची (Kishor Jorgewar) पुन्हा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चैनसुख संचेती यांच्याकडे निवडणूक निरीक्षक पद कायम ठेवण्यात आलं आहे.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची निवडणूक प्रमुख पदावरून गच्छंती करण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा किशोर जोरगेवार यांच्या निवडणूक प्रमुखपदी नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं आहे.
Chandrapur Election : नगरपालिका निवडणुकीनंतर नाराजी
चंद्रपुरात जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत भाजपला हवं तसं यश मिळालं नाही. त्यानंतर पक्षानंच माझी ताकद कमी केली असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. अशातच महापालिका निवडणुकीत सुधीरभाऊंना बळ देऊ असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर सुधीर मुनगंटीवर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट देखील झाली होती.
किशोर जोरगेवारांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली होती. चंद्रपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये 11 पैकी भाजपला केवळ 2 ठिकाणीच विजय मिळाल्यानंतरही मुनगंटीवारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. शनिशिगणापूरनंतर आपल्या पक्षाची दारं ही सर्वांसाठी खुली असतात, कुणालाही पक्षात घेतलं जातं असं मुनगंटीवार म्हणाले होते. त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईट भेट घेऊन चर्चा केली होती.
Kishor Jorgewar vs Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार-जोरगेवार वाद काय?
भाजपचे माजी मंत्री मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे. चंद्रपुरातील कॅन्सर हॉस्पिटलच्या उद्घाटनाबाबत किशोर जोरगवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्राबाबत मुनगंटीवार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मुनगंटीवार मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटले होते.
माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर आणि किशोर जोरगेवार देखील त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटले. या सर्व गटबाजीचा आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता पक्षाला वाटली असावी.
ही बातमी वाचा:























