Chandrapur: बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, बाळू धानोरकरांचं विजय वडेट्टीवारांना आव्हान
Chandrapur APMC Election: धानोरकरांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळेच मंत्री झाल्याचा दावा केला आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर बाजार समितीच्या निकालानंतर (Chandrapur APMC Election) जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहतो, असं आव्हान धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिले आहे. सोबतच धानोरकरांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळेच मंत्री झाल्याचा दावा केलाय. तसंच चंद्रपूर बाजार समितीत वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला अशी टीका केली आहे
बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील (Congress) अंतर्गत संघर्ष समोर आला आहे. बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर टीका केली आहे. विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळे विरोधी पक्षनेते आणि मंत्री झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात कोणत्याच कार्यकर्त्यांचं काम केलं नाही. आमदाराला निधी दिला नाही, कार्यकर्ते मजबूत केले नाही असा केला आरोप देखील धानोरकर यांनी केला आहे. चंद्रपूर बाजार समितीत धानोरकर यांच्या पॅनल विरोधात वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे. त्यानंतर धानोरकर यांनी वडेट्टीवारांवर केली जोरदार टीका केली आहे. बाजार समितीच्या निकालानंतर काँग्रेसमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
शिंदेंनी आणली एकहाती सत्ता
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने इथे एकहाती सत्ता मिळवली आहे. शिवसेना (उबाठा) समर्थित पॅनेलला 18 पैकी 12 जागा मिळाल्या आहे. तर काँग्रेस समर्थित पॅनलला 6 जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना (उबाठा) नेते रवींद्र शिंदे यांचा हा मोठा विजय मानला जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती च्या रूपाने शिवसेनेची एकहाती सत्ता असलेली पहिली बाजार समिती आली आहे.
दिग्गज नेत्यांच्या पॅनेलचा पराभव
राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरु आहे. निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काही ठिकाणी दिग्गज नेत्यांच्या पॅनेलचा पराभव झाल्याचे चित्र दिसत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
APMC Election: आमदार गोपीचंद पडळकरांची ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; आटपाडीत बाजार समिती मतदान केंद्रावरील प्रकार