एक्स्प्लोर

वाघाच्या हल्ल्यात 8 दिवसांत आठ जण ठार; वाढलेली संख्या शाप की वरदान; काँग्रेस नेत्याचा संताप

मेलेल्या माणसांचा जीव परत येणार का असं असेल तर मग वनविभागाच्या माणसांचा जीव द्या आणि त्यांना पैसे द्या अशी मागणीही त्यांनी केलीय.

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात आठ दिवसात आठ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर  पुन्हा एका घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता चंद्रपुरात वाढलेली वाघाची संख्या खरंच वरदान आहे की शाप असा प्रश्न उपस्थित केला जातोय.  चंद्रपूर जिल्ह्यात 8 दिवसात 8 जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेलाय, यावर काँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार तीव्र संताप व्यक्त केला आहे. वाढलेल्या वाघांच्या संख्येमुळे अधिवासाच्या समस्येवर वनमंत्री व पालकमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन तोडगा काढावा, नाही तर वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांचं प्रेत वनविभागाच्या कार्यालयात नेऊन ठाण मांडू असा इशाराच काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी दिला आहे. (Vijay Wadettiwar)

वाघांची वाढलेली संख्या शाप की वरदान...

चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेली वाघांची संख्या हे जिल्ह्यासाठी वरदान आहे की शाप असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. या मुद्द्यावर पालकमंत्री आणि वनमंत्री यांना तातडीने बैठक घेण्याची मागणी केली.
मागील पालकमंत्र्यांनी (मुनगंटीवार) मदतीची रक्कम वाढवण्याचे जाहीर केले होते पण फक्त पैसे देऊन सर्व समस्या सुटणार का? मेलेल्या माणसांचा जीव परत येणार का असं असेल तर मग वनविभागाच्या माणसांचा जीव द्या आणि त्यांना पैसे द्या अशी मागणीही त्यांनी केलीय.

आठ दिवसात वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेल्याने सर्वत्र भीती व दहशतीचे वातावरण आहे. सध्या तेंदूपत्ता तोडणीचा हंगाम असल्यामुळे जंगलपरिसरात तेंदुपत्ता तोडणीसाठी नागरिक जात आहेत. सामान्यांसाठी तेंदूपत्ता तोडणीच्या वेळा निश्चित केलेल्या असताना नागरिक अधिक तेंदूपत्ता मिळावा यासाठी संध्याकाळी, रात्री..वनविभागाने दिलेल्या वेळा डावलूनही जंगलात जात असल्याने वाघांच्या हल्ल्यात हाकनाक जीव गमावत असल्याचं दिसून येत आहे. वन्य प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या जंगलांमध्ये नागरिकांनी दिलेल्या वेळेनंतर जाऊ नये यासाठी काहीतरी तरतूद करण्याची गरज असून नागरिकांवर होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

Tiger Attack Chandrapur: वाघांची दहशत कायम! चंद्रपुरात गेल्या 72 तासांत 5 महिलांचा मृत्यू,ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget