एक्स्प्लोर

Sanjay Gaikwad : माझा उद्देश सफल झाल्याने उमेदवारी मागे घेणार, बंडखोरी करणाऱ्या संजय गायकवाडांचं एक पाऊल मागे

Lok Sabha Election 2024 : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बंडखोरी करत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Lok Sabha Election 2024 : बुलढाणा लोकसभा मतदारसंघात (Buldhana Lok Sabha Constituency) शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाकडून (Shinde Group) खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यावर देखील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांनी (Sanjay Gaikwad) उमेदवारी दाखल केला होता. मात्र, आता आपण आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा गायकवाड यांनी केली आहे. विशेष म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण अर्ज दाखल केला होता, तो उद्देश आता सफल झाला असल्याने आपण माघार घेत असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. पण, तो उद्देश कोणता हे वेळ आल्यावर सांगेल असेही गायकवाड म्हणाले. 

'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया देतांना संजय गायकवाड म्हणाले की, "आज मी प्रतापराव जाधव यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या रॅलीत जाणार आहे. त्यांना निवडणून आणण्यासाठी आणि पुन्हा देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहोत. माझा उमेदवारी अर्ज लवकरच मी मागे घेत आहे. माझा जो काही उद्देश होता तो सफल झाल्याने आता उमेदवारी अर्ज मेग घेणार असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. 

विजयराज शिंदे यांच्यावर टीका...

दरम्यान भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी देखील बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावर बोलतांना संजय गायकवाड म्हणाले की, 'विजयराज शिंदे हा काल परवा पर्यंत उद्धव गटाकडे उमेदवारी मागत होता. बुलढाणा जिल्ह्यात विजयराज शिंदे याने भाजप पक्ष संपवला आहे. विजयराज शिंदे यांच्यामागे निष्ठावान भाजप कार्यकर्ते नाहीत. लवकरच विजयराज शिंदे यांचा उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला जाईल. आम्ही महायुतीकडे तशी मागणी करणार आहोत. ही निवडणूक आमच्यासाठी सोपी आहे आणि प्रतापराव जाधवच निवडणूक जिंकतील असे संजय गायकवाड म्हणाले आहेत. 

प्रतापराव जाधवांच्या उमेदवारी दाखल कोणताही मोठा नेता नाही

विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना महायुतीकडून शिवसेनेची उमेदवार जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आपला उमेदवारी अर्ज ते आज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी जाधव हे एका सभेला संबोधित करतील. विशेष म्हणजे मागील तीन लोकसभा निवडणुकीत प्रतापराव जाधव सतत विजयाचा भगवा फडकवतांना पाहायला मिळत आहे. असे असतांना त्यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी पक्षाचा किंवा महायुतीचा एकही मोठा नेता येणार नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut Mumbai : महाराष्ट्रात ३ उपमुख्यमंत्री होणार, शिंदे आज उपमुख्यमंत्री आहेत उद्या नसतील - राऊतABP Majha Marathi News Headlines 03PM TOP Headlines 03 PM 24 January 2025Supriya Sule: 'राज्यात हार्वेस्टिंग घोटाळा;कृषीमंत्र्यांनी मान्य केलं,केंद्राला माहिती देणार'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Waqf Bill JPC Meeting : ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
ही अघोषित आणीबाणी, त्यांना वाटतं, आम्ही उपपंतप्रधान आणि उपगृहमंत्री! वक्फ दुरुस्ती विधेयकावर बैठकीत राडा; अरविंद सावंतांसह 10 खासदार निलंबित
Donald Trump Ends Birth right Citizenship : 'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
'अमेरिकन' होण्यासाठी जीवाचा आटापिटा केलेल्या भारतीयांना दिलासा; जन्मसिद्ध नागरिकत्व संपुष्टात आणण्याच्या ट्रम्प यांच्या आदेशाला स्थगिती
Paytm Share : ईडीनं 8 पेमेंट गेटवेच्या खात्यामधील 500 कोटी रुपये गोठवले, पेटीएमचं नाव येताच शेअर गडगडला, कंपनीकडून BSE कडे स्पष्टीकरण
पेटीएमचा शेअर पुन्हा गडगडला, ईडीच्या एका कारवाईचा परिणाम, बाजारात नेमकं काय घडलं?
Virendra Sehwag : बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
बचपन का प्यार मेरा म्हणत मुलतानचा सुलतान अरुण जेटलींच्या बंगल्यावर आरतीच्या 'बेडीत' अडकला; 21 वर्षांनी सेहवागच्या आयुष्यात वादळं का आलं?
Embed widget