एक्स्प्लोर

बिहार निवडणूक निकाल 2025

(Source:  ECI | ABP NEWS)

Buldhana News : बेपत्ता सामाजिक कार्यकर्त्याच्या शोधासाठी कुटुंबीय, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या

Buldhana News : उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. रात्रंदिवस हा ठिय्या सुरु आहे.

Buldhana News : बुलढाण्यात (Buldhana) उपोषणस्थळावरुन बेपत्ता झालेले सामाजिक कार्यकर्ते (Social Activist) संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. रात्रंदिवस हा ठिय्या सुरु आहे. ग्रामस्थांनी आणि कुटुंबीयांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच रात्र काढली. गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत. उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर हे चार दिवसांपासून बेपत्ता आहेत.

जिल्ह्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टाचार केला, असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. पण चौकशी किंवा कारवाई झाली नाही. म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं आणि त्यांनी एकट्यानेच उपोषण सुरु केलं. 14 ऑगस्टला संतोष गाळकर हे पावसाळी दिवस असल्याने त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीत पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळवल्या होत्या.

15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर उपोषणस्थळाहून बेपत्ता
उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनाने दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन, त्या दिवशीही दखल घेतली नाही आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहून बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं. संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्याने नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला. मात्र सायंकाळपर्यंत ते आढळून न आल्याने त्यांच्या मुलाने तामगाव पोलिसात वडील उपोषणस्थळाहून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य तात्काळ ओळखून तक्रार दाखल करुन दोन पथक संतोष यांच्या शोधासाठी रवाना देखील केली. मात्र आता चार दिवस होऊनही संतोष गाळकर यांच्या बेपत्ता होण्याचं रहस्य उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे.

आता ग्रामस्थ आणि कुटुंबियांनी संतोष गाळकर यांचा शोध घ्यावा या मागणीसाठी थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनातच ग्रामस्थ झोपले तसंच जेवणही तिथेच करत आहेत.

ग्रामसेवक अविनाश येनकर व पंचायत समिती प्रशासनाचा हात : गाळकर कुटुंबियांचा आरोप
दरम्यान संतोष गाळकर यांचा मुलगा सुपेश गाळकर याने आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे तर गटविकास अधिकारी संजय पाटील म्हणतात ते गायब होण्यामागे आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.

जनतेसाठी नेहमी झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता असा अचानक बेपत्ता झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे तर पोलीस प्रशासनाची दोन पथकं अहोरात्र बेपत्ता संतोष यांचा शोध घेत आहेत. पण संतोष गाळकर नेमके गेले तरी कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Bihar Election Result 2025: नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
नितीश कुमार सरकारवर 62 हजार कोटींच्या घोटाळ्यांचा आरोप केला अन् निकाल लागताच भाजपकडून माजी केंद्रीय मंत्र्याची हकालपट्टी
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
PM नरेंद्र मोदी चंद्रावरही शिवशक्ती कॉलनी उघडणार; भाजपच्याच मंत्र्यांचा दावा, आदित्य ठाकरेंना टोला 
Bihar Election Result 2025: बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
बिहारमधील दारुण पराभवानंतर राहुल गांधी थेट मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी पोहोचले; दोन आठवड्यात पुरावे मांडणार
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
खळबळजनक! प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा अचानक मृत्यू; वनमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Home :  स्वप्नातील घर खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींवर लक्ष ठेवा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता
नवं किंवा जुनं घर, दुकान खरेदी करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा मोठा फटका बसण्याची शक्यता
Embed widget