एक्स्प्लोर

अखेर बुलढाण्यातील 'तो' उपोषणकर्ता 5 दिवसांनी सापडला; पण बेपत्ता झाले कसे? प्रश्न अद्याप अनुत्तरीतच

Maharashtra Buldhana News : बुलढाण्यातून गायब झालेला उपोषणकर्ता अखेर पाच दिवसांनी सापडला आहे. ते आजारी असून सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Maharashtra Buldhana News : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर पंचायत समितीसमोर आपल्या वरवट खंडेराव या गावातील समस्यांसाठी 14 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले संतोष गाळकर हे अचानक 15 ऑगस्टच्या मध्यरात्री उपोषणस्थळावरून गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी ही बाब समोर येताच संतोष यांच्या मुलानं वडील बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिली होती. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले संतोष गाळकर हे काल संध्याकाळी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पिंप्री जैन गावाजवळ एका झाडाखाली सापडले. ते आजारी होते. या गावातील नागरिकांनी तात्काळ संतोष गाळकर यांच्या नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. नातेवाईकांनी संतोष यांना उपचारासाठी शेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केलं असून संतोष हे सध्या काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले संतोष गाळकर हे अचानक बेपत्ता कसे झाले? आपला चष्मा, कपडे, चप्पल उपोषणस्थळी सोडून ते कुठे गेले होते का? त्यांना कुणी नेलं होतं? ते बेपत्ता होण्यामागे काय करणं होती? याचा शोध आता पोलिसांनी घेणं आवश्यक आहे. 

प्रकरण नेमकं काय? 

बुलढाण्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टचार केला म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. पण त्यांच्या तक्रारींची दखल कोणीच घेतली नाही. चौकशी नाही, कारवाई नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं. त्यांनी एकट्यानंच उपोषण सुरू केलं. 14 ऑगस्टला संतोष गाळकर पावसाळी दिवस असल्यानं त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीतच पंचायत समिती प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळविल्या होत्या. 

उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष गाळकर यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनानं दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, त्या दिवशीही दखल घेतली नाही. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहुन बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं. संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते, त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्या. म्हणून नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला, मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्यानं त्यांच्या मुलानं तामगाव पोलिसांत वडील उपोषणस्थळातून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तात्काळ पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य बघून तक्रार दाखल करून दोन पथकं संतोष यांच्या शोधासाठी रवाना केली. तब्बल पाच दिवसांनी संतोष गाळकर सापडले ते थेट अकोल्यात. तेही आजारी अवस्थेत. 

संतोष गाळकर यांच्या गायब होण्याचं अद्याप उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे. संतोष यांचा मुलगा सुपेश गाळकर यानं आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, गट विकास अधिकारी संजय पाटील म्हणतात, ते गायब कसे झाले, आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Buldhana News : बेपत्ता सामाजिक कार्यकर्त्याच्या शोधासाठी कुटुंबीय, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
तुकाराम मुंढे साहेब, एकदा बुलढाण्यात या, इकडच्या साहेब लोकांनी...; 75 वर्षीय आजींची विनंती, नेमकं काय काय म्हणाल्या?, VIDEO
Buldhana Crime News: 'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
'राजकीय विरोधकांच्या धमक्यांना कंटाळलोय'; बुलढाण्यातील सरपंचाने व्हिडिओ पोस्ट करत संपवली जीवनयात्रा
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना
कुठल्याही वैद्यकीय मदतीविना महिलेनं एकाचवेळी दिला चार बाळांना जन्म, बुलढाण्याच्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील घटना

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget