एक्स्प्लोर

Buldhana News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मराठीच्या मुद्द्यावर बँकेत राडा; मराठी न बोलता येणाऱ्या मॅनेजरला धरलं धारेवर

Buldhana News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्त्यांनी मराठी न बोलता येणाऱ्या खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला चांगलेच धारेवर धरलंय.

Buldhana News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्त्यांनी मराठी न बोलता येणाऱ्या खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरला चांगलेच धारेवर धरलंय. काल (28 फेब्रुवारी) खामगाव येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत मराठीच्या मुद्द्यावर चांगलाच गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले. खामगाव येथील बँक ऑफ बडोदाचे मॅनेजर तिवारी हे बिहारमधील असून त्यांना मराठी बोलता येत नाही. ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे घरकुल योजना, प्रधानमंत्री किसान योजना आणि लाडक्या बहीण अशा योजनेतील पैसे परस्पर कर्ज खात्यात वर्ग झाल्याने अनेक शेतकरी तिवारी नामक मॅनेजरकडे आपली तक्रार घेऊन जातात. 

 मॅनेजर मराठीत न बोलता हिंदीतच बोलतो, शेतकऱ्यांच्या तक्रारी

मात्र हे मॅनेजर मराठीत न बोलता हिंदीत बोलतात व हिंदी भाषा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना समजत नसल्याने अनेक अडचणींचा सामना या शेतकऱ्यांना करावा लागतो. या मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील व कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये जात मोठा गोंधळ घातला. तुम्हाला मराठी बोलता येत नाही, तर तुम्ही इकडे आले कशाला? तुम्ही परत जा....! तुम्हाला मराठी बोलावेच लागेल...!  अशा शब्दात अमोल पाटील यांनी गोंधळ घालत तिवारी यांची कान उघडणे केली. यावेळी जवळपास दीड तास बँकेत चांगलाच गोंधळ उडाला होता.

देशी कट्टा अन् धारदार चाकूचा धाक दाखवित लुटपाट, तिघांना बेड्या 

पांढरकवडा येथे एका धाबा चालकासह त्यांच्या मुलाला तिघांनी देशी कट्टा आणि धारदार चाकूचा धाक दाखवित लुटल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात काउंटर मधील 15 हजार रुपये बळजबरीने हिसकावून आरोपी पसार झाले आहेत. करण संजय शिंदे, सुजिम वानखडे, शेख समीर शेख चांद असे लूटमार करणारे आरोपींची नाव आहे. अंकित आणि नरपत राम कुलरिया हे दोघे धाबा मालक धाबा बंद करीत होते. दरम्यान आलेल्या आरोपींनी जेवण मागण्याचा बहाना करून त्यांच्याशी वाद घातला. तसेच चाकू आणि देशी कट्ट्याचा धाक दाखवून काउंटरमध्ये असलेले 15 हजार रुपये हिसकावून पळ काढला. त्यानंतर धाबा मालक यांनी लगेचच पांढरकवडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरम्यान पांढरकवडा पोलिसांनी घटनेची रीतसर माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू करत काही वेळातच आरोपीला अटक केली.

हे ही वाचा 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक

व्हिडीओ

Vijay Sethupathi Majha Katta : 96 चा हिरो, साऊथचा सुपरस्टार, विजय सेतूपतीची माझा कट्टावर मोठी घोषणा
Burkha in Local Train : मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर Special Report
ZP Election Election : जिंकली लोकशाही, आजी नववधूच्या बोटाला शाई Special Report
Zp Election Voting Politics : मतदानाचा 'पोर'खेळ, लोकशाहीचा खेळ? Special Report
Pawar Family Together : पार्थ पवार- शरद पवारांचे एकत्र फोटो पाहून राजकीय चर्चेला उधाण Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employees Salary : वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
वाढीव वेतनाचा हप्ता गायब! एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक; तीन दिवसांत पैसे न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 फेब्रुवारी 2026 | शनिवार
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
MNS : बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
बोरीवली, दहिसरमध्ये फक्त मराठी फेरीवाल्यांवर कारवाई, परप्रांतियांकडे दुर्लक्ष; मनसे आक्रमक
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
Embed widget