एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

करियरचा पहिला चित्रपट हिट, पण त्यानंतरचे सलग 10 चित्रपट फ्लॉप; आजही 'ब्लॉकबस्टर' टॅगसाठी तरसतोय दिग्गज अभिनेत्याचा भाचा!

Bollywood Actor Life : 2012 मध्ये एका चित्रपटातून दोन नवोदित कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एकत्र प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट बॉक्स-ऑफिसवर यशस्वी ठरला.

Bollywood Actor Life : बॉलिवूड (Bollywood) अॅक्टर्स आणि त्यांची लाईफ याबाबत माहिती करून घेण्यासाठी अनेकांना उत्सुकता असते. फेमस अॅक्टर्स आणि त्यांचे लाईफस्टाईल (Lifestyle) किंवा त्यांच्या करियरच्या चर्चा नेहमीच रंगलेल्या असतात. पण, आज आम्ही अशा एका अभिनेत्याबाबत बोलणार आहोत, ज्या अभिनेत्यानं आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच ब्लॉकबस्टर चित्रपट दिला. पण त्यानंतर मात्र, या अभिनेत्याच्या करियरला ग्रहण लागलं. पहिला चित्रपट हिट दिल्यानंतर, त्यानंतर लागोपाठ 10 चित्रपट फ्लॉप झाले. वडिल बॉलिवूडचे निर्माते, काका बॉलिवूडचे सुपरस्टार तरीसुद्धा हिट चित्रपटासाठी आजही हा स्टारकीड (Starkid) तरसतोय. 

2012 मध्ये एका चित्रपटातून दोन नवोदित कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एकत्र प्रवेश केला. त्यांचा पहिला चित्रपट बॉक्स-ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. ज्यावरून हे दोन्ही नवखे स्टार्स इंडस्ट्रीच्या शर्यतीत सहभागी होतील आणि मोठ्या स्टार्स टक्कर देतील, असा विश्वास प्रेक्षकांना वाटला. पहिल्या 1-2 वर्षांत हिट चित्रपट दिल्यानंतर या दोन्ही कलाकारांच्या करिअरला ग्रहण लागलं. दोघांनाही काम मिळणं कठीण झालं.

आजतागायत ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या शोधात असलेला स्टारकीड म्हणजे, अर्जुन कपूर (Arjun Kapoor). बॉलिवूडचे निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांचा मुलगा आणि ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा पुतण्या. अर्जुननं 'इशकजादे' (Ishaqzaade) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 2012 मध्ये आलेल्या या सुपरहिट चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा दिसली होती. पहिल्याच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर अर्जुन कपूरच्या अभिनय कारकिर्दीचा आलेख सातत्यानं घसरत राहिला. त्यांना चित्रपटसृष्टीत 12 वर्ष झाली आहेत, या काळात त्याच्या केवळ 1-2 चित्रपटांनाच प्रेक्षक आणि समीक्षकांनी दाद दिली आहे.

पहिला चित्रपट ब्लॉकबस्टर, पण त्यानंतरचे...

करियरच्या सुरुवातीलाच 'इशकजादे' या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या यशानं अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा दोघेही रातोरात स्टार झाले. हबीब फैजल दिग्दर्शित या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली. 19 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 63 कोटींचं कलेक्शन केलं होतं.

पदार्पणाच्या पुढच्याच वर्षी अर्जुन कपूरनं एक चित्रपट साईन केला, आणि अर्जुन कपूरच्या करिअरला उतरती कळा लागण्यासाठी हीच मोठी चूक ठरली. या चित्रपटात अर्जुन 'औरंगजेब'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. 'औरंगजेब'नंतर अर्जुन कपूर 'गुंडे' चित्रपटात रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रासोबत दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाला चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट सरासरी कमाई करू शकला.

करिअरला उतरती कळा, अजूनही ब्लॉकबस्टरची प्रतिक्षा

त्यानंतर अर्जुनच्या डळमळीत कारकिर्दीला '2 स्टेट्स' या चित्रपटाची साथ मिळाली, पण त्याला त्याची अभिनय कारकीर्द पुन्हा रुळावर आणता आली नाही. गेल्या 12 वर्षात अर्जुन कपूरचे फक्त 2 चित्रपट सुपरहिट झाले आहेत आणि फक्त 4 चित्रपटांना हिटचा टॅग मिळाला आहे. गेल्या वर्षी तो 'कुत्ते'मध्ये दिसला होता. 'कुत्ते'मध्ये तो तब्बू आणि राधिका मदनसोबत दिसला होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतुक केलं, परंतु हा चित्रपट देखील त्याची कारकीर्द पुन्हा रुळावर आणू शकला नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

राजेश खन्नांच्या घरी AC रिपेअर करण्यासाठी पोहोचला सुपरस्टार; त्यानंतर नशीब पालटलं अन् थेट बॉलिवूडमधून हॉलिवूड गाठलं!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget