एक्स्प्लोर

India Pakistan War: लाहोर विमानतळाजवळ कानठळ्या बसवणारे तीन मोठे स्फोट,पाकिस्तानकडून शीघ्र हालचाली; नक्की काय घडलं?

Blast in Lahore: पाकिस्तानमधील लाहोरच्या भागात सलग तीनवेळा बॉम्बस्फोट झाला आहे.

Blast in Lahore: भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत (Opration Sindhoor) पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला. काल (7 मे) मध्यरात्री 1.05 वाजताच्या सुमारास भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. भारतीय लष्कराकडून 15 दिवसात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यात आला. अवघ्या 23 मिनिटांत भारतीय सैन्यदलांकडून ऑपेरशन सिंदूर फत्ते करण्यात आले. 

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान सावरला नसताना आज सकाळी लाहोरमध्ये तीन मोठे स्फोट (Blast in Lahore) झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतासोबत वाढत्या तणावादरम्यान, आज (8 मे) पाकिस्तानातील लाहोरमधील वॉल्टन विमानतळ, गोपाल नगर आणि नसराबाद भागात स्फोटांचे आवाज ऐकू आले. बचाव आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते, सलग तीन बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर पाकिस्तानकडून हालचालींना वेग आला आहे. नेमका स्फोट का झालाय?, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या-

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये हालचाली वाढल्या आहेत. पाकिस्तानकडून ताबा रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर जमवाजमव सुरु आहे. पाकिस्तानकडून युद्धसामग्री आणि रणगाडेही तैनात करण्यात आले आहेत.  लाहोरमध्ये 'नोटीस टू एअर मिशन' जारी करण्यात आली आहे. लाहोरकडे जाणारी-येणारी सर्व विमानं रद्द करण्यात आली आहेत. तसेच सीमावर्ती भागातली पाकमधली गावंही रिकामी करण्यात आली आहेत. 

एका व्यक्तीने जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधलं-

पाकिस्तानातील मुरीदके फुटबॉल स्टेडियममध्ये पोलीस आणि सैन्याच्या सुरक्षेत लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांची अंत्ययात्रा काल काढण्यात आली. पाकिस्तानी लष्कराचे अनेक बडे अधिकारी या अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. त्यात एका व्यक्तीने जागतिक समुदायाचं विशेष लक्ष वेधून घेतलंय. शवपेट्यांपुढे नमाज पढणारा हा कोणी धर्मगुरू नव्हता तर तो होता लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ...लष्कराचे अधिकारी या दहशतवादी रौफच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

China On Operation Sindoor: भारताकडून एअर स्ट्राईक; पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणारा चीन भडकला, म्हणाला...

Iran On India And Pakistan: दक्षिण आशियातील भारताचा सच्चा मित्र म्हणून ओळख असणाऱ्या इराणचं पाकिस्तानमधून मोठं विधान; परराष्ट्रमंत्री म्हणाले...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले

व्हिडीओ

Yogesh Gonnade आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करुन अर्ज,शिवसेनेकडून उमेदवाराला स्मशानभूमीत AB फॉर्म
Neelam Gorhe : भाजपा आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही; आमची युती...; नीलम गोऱ्हे काय म्हणाल्या?
Raj Thackeray At Matoshree : राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
Sambhajinagar Angry Candidate : तिकीट नाकरलं, भाजप महिला पदाधिकाऱ्याचा संभाजीनगरमध्ये तुफान राडा
Sana Malik on BMC Election : आमच्या शिवाय मुंबईचा महापौर बसणार नाही,सना मलिकांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
बांगलादेशच्या माजी पीएम खालिदा झिया यांचे निधन; पाकिस्तानात नजरकैद, गोळीबारात वाचल्या, पीएम होताच भारताचा विरोध
BMC Election: ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
ठाकरे बंधूंच्या युतीत एकाच प्रभागात दोन महिला आमने-सामने अन् शिवसैनिकांसह मनसैनिकही संभ्रमात!
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
तर त्याला टायरीत घालतो म्हणणाऱ्या 'पालकमंत्री' अजितदादांकडून पुण्यात अट्टल गुन्हेगारांना रेड कार्पेट सुरुच! आंदेकर, गजा मारणेच्या बायकोनंतर आणखी एक गुन्हेगार शोधत उमेदवारीची 'बक्षिसी'
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
पुण्यात नऱ्हेजवळ भुमकर चौकात भयंकर ट्रॅफिक; नववर्षानिमित्त येणाऱ्या पर्यटकामुळे पुणेकर अडकले
BMC Election: ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडाची लागण! थेट पक्षप्रमुखांसमोर अनिल परबांनी ताकद लावलेल्या उमेदवारानं सुद्धा बंडाची मशाल पेटवली, वरुण सरदेसाईंना तगडा झटका?
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
पहिल्यांदा नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या गाड्यांचा चक्क पाठलाग, आता थेट आमदार सीमा हिरे आणि उमेदवाराच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल!
Ajit Pawar NCP in BMC Election: अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
अजित पवारांकडून पुण्यात गुंडांच्या टोळ्यात तिकिट वाटप; मुंबईतही एकनाथ शिंदेपेक्षा वरचढ ठरले! किती जागांवर उमेदवार रिंगणात?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget