BJP on OBC Mahasangh : भाजपच्या ओबीसी आमदारांचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मागण्यांना समर्थन; नागपुरातील साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस
OBC Mahasangh : मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, या मागणीला ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. दरम्यान, याच मागणीला आता भाजपच्या ओबीसी आमदारांनी समर्थन दिले आहे.

BJP on OBC Mahasangh : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून (1 सप्टेंबर) पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान,ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, या मागणीला ओबीसी महासंघाने विरोध केला आहे. दरम्यान, याच मागणीला आता भाजपच्या ओबीसी आमदारांनी समर्थन दिले आहे.
ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस
नागपूर येथे सामूहिक पत्रकार परिषद घेत, ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही, याबद्दल आम्ही तत्पर आहोत आणि राज्य सरकारची पण तीच भूमिका आहे. ओबीसी समाजाने याबद्दल आश्वस्त राहावे, अशी भूमिका भाजपच्या ओबीसी आमदारांनी घेतलीय. नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देवू नये , मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देवू नये, ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे. तर सरकारकडून लेखी आश्वासन मिळत नाही तेव्हापर्यंत आंदोलन सुरु राहील, अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाने घेतली आहे.
जालन्यातील अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण
जालन्यातील अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी समाजाचं उपोषण सुरु करण्यात येणार आहे. तर नागपूरच्या संविधान चौकातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करण्यासाठी आता ओबीसी समाजाने पुढाकार घेत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,
2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.
3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.
4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.
आणखी वाचा
























