Child Serial Killer : जगातला सगळ्यात लहान वयाचा सीरियल किलर , वयाच्या आठव्या वर्षी तिघांना संपवलं
Crime News: आजकाल ओटीटी प्लॅटफाॅर्मवर अनेक क्राईम संबंधित वेब सिरीज दाखवल्या जातात. त्याचा थेट परिणाम लहान मुलांच्या मनावर होतो. असाच एक मुलगा ज्याने वयाच्या आठव्या वर्षी तीन खून केले आहेत.
Bihar Child Serial Killer : काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सवर डॅमर नावाची एक वेब सिरीज आली होती, ज्यामध्ये सीरियल किलरची कथा दाखवण्यात आली होती. याआधीही ओटीटीवर अनेक वेब सीरिज आल्या आहेत, ज्यामध्ये सीरियल किलरची कथा दाखवण्यात आल्या आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात लहान सीरियल किलर माहीत आहे का? हा सीरियल किलर आपल्याच देशात भारतातील बिहार राज्यात आहे.
हा आहे जगातील सगळ्यात लहान सीरियल किलर
जगातील सगळ्यात लहान सीरियल किलरचे नाव आहे अमरजीत सदा. अमरजीत सदाला वयाच्या आठव्या वर्षी सीरियल किलिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले होते. वयाच्या आठव्या वर्षी या मुलाने तिघांची हत्या केली होती. बिहारमधील मुशहरी गावात जन्मलेला अमरजीतची ओळख जगातला सगळ्यात लहान सीरियल किलर म्हणून झालेली आहे. अमरजीत सदा याचा जन्म 1998 मध्ये झाला. 2007 मध्ये पोलिसांनी त्याला तिघांची हत्या केल्याप्रकरणी अटक केली.
प्रकरण कसे आले समोर
2007 साली पोलीस एका लहान मुलीच्या खून प्रकरणी तपास करत होते. हत्या झालेल्या मुलीच्या पालकांनी शेजारी राहणाऱ्या अमरजीत सदा याच्यावर संशय असल्याचे सांगितले होते. यावेळी अमरजीत सदा केवळ 8 वर्षांचा होता. अमरजीतबद्दल ऐकून प्रथम पोलिसांना आश्चर्य वाटले आणि त्यावर विश्वास बसला नाही, पण जेव्हा सर्व पुरावे त्याच्या विरोधात आहेत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. काही वेळानंतर अमरजीत सदाने सांगितले की, त्या लहान मुलीची हत्या त्यानेच केलेली होती. याच सोबत त्याने आणखीन दोन खून केलेले असल्याचेही त्यावेळी त्याने मान्य केले. एवढेच नाही तर स्वत:च्या लहान बहिणीची देखील हत्या केली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
हत्या करण्यामागील कारणं काय?
जेव्हा या प्रकरणाचा तपास केला गेला त्यावेळी मानसोपचार तज्ञांनी सांगितले की , अमरजीत सदाला कंडक्ट डिसऑर्डर (Conduct Disorder) नावाचा आजार आहे. या आजारामुळे तो इतरांना वेदना देण्यात आनंद मिळायचा. या कारणावरून तो लहान मुलांना दगडाने ठेचून मारायचा.
इतर महत्वाच्या बातम्या
Latur News : दोन गटातील हाणामारीनंतर 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; शाळा प्रशासनाची बाजू आली समोर.