एक्स्प्लोर

भंडाऱ्यात हिट अँड रनची घटना, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, तर कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रिलस्टारचा अपघाती मृत्यू

भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Bhandara Accident News : भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अपघातास कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक पळून गेला आहे. हा अपघात भंडारा - साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव इथं पेट्रोलपंप समोर घडला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला

मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक वालदे (63) आणि भिवा बोंदले (70) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही भंडाऱ्याच्या धारगाव येथील रहिवाशी आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रिलस्टार प्रेम भाटी यांचा अपघाती मृत्यू

कल्याणमध्ये एका दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. सुप्रसिद्ध रिलस्टर, प्रेम भाटी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोहने परिसरात घरी जात असताना हा अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची गाडी घसरली आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.

धुळे जिल्ह्यात देखील भीषण अपघाताची घटना, तीन जणांचा मृत्यू 

धुळे जिल्ह्यात देखील भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे शहरा जवळील पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स परिसरात भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्स ने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास  घडली आहे. या अपघातात वरखेडी येथील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरखेडी गावातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला? हे अद्याप समजू शकलेलं नाही. या अपघातात वरखेडे येथील सुभाष धनगर, नंदू पाटील, सिंधुबाई पाटील यांचे निधन झालं आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget