एक्स्प्लोर

निष्ठावंतांना डावलून सत्तापिपासू लोकांना पक्षात स्थान मिळतंय, निष्ठावंतांची वज्रमुठ तयार करा; भंडारा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांचे आवाहन

Bhandara Politics News : भंडारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी दिली. 

भंडारा : शरद पवार साहेबांनी आज राजकीय निष्ठेला सर्वाधिक महत्त्व असल्याचे म्हटले आहे. अशात  सर्वच प्रमुख पक्ष फिरून आलेल्या आणि राजकीय निष्ठेशी कुठलाही संबंध नसलेल्या माजी आमदार चरण वाघमारे यांना स्वतः त्यांनी पक्ष प्रवेश आणि तिकीट कसे काय दिले? असा सवाल भंडारा जिल्ह्यातील पवार गटाचे जिल्हाध्यक्ष किरण अतकरी यांनी विचारला आहे.

किरण अतकरी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्र समिती असे कितीतरी पक्ष फिरून आलेले आमदार चरण वाघमारे यांची राजकीय भूमिका कधीच स्थिर नसते आणि निष्ठा सतत बदलत असते. हे आता पर्यंत कित्येक वेळा सिद्ध झाले आहे. आता त्याच चरण वाघमारे यांना पक्षामध्ये प्रवेश देण्यात आला आहे. कितीतरी पक्ष बदलून आलेले आणि प्रत्येक वेळी आपल्या पक्षाशी विसंगत भूमिका घेणारे चरण वाघमारे म्हणतात की मला शरद पवार साहेबांनी स्वतः आग्रह करून पक्षात घेतले आणि तिकीट दिले आहे. या मागे सत्य काय आणि असे करण्यामागे काय कारण होते, असा प्रश्न आता भंडारा जिल्ह्यातील राशप आणि काँग्रेस कार्यकर्तेच विचारत आहेत.

चरण वाघमारे यांना तुमसर येथून महाविकास आघाडीचे तिकीट दिल्यास आम्ही त्यांचे काम करण्यापेक्षा घरी बसणे पसंत करू, असे आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उघडपणे म्हणत आहेत. 

या संबंधित गुरुवार, 17 ऑक्टोबर रोजी मुंबई प्रेस क्लब येथे महत्त्वाची पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. विदर्भातील महाराष्ट्र विकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते या पत्रकार परिषदेला संबोधित करतील. महाविकास आघाडीचे भंडारा जिल्ह्यातील प्रमुख नेते तसेच वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्याचवेळी डारा जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देणार असल्याची माहिती आहे. 

पत्रकार परिषदेत माजी आमदार अनिल बावनकर, माजी खासदार शिशुपाल पटले, राष्टवादी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष किरण अतकरी, जिल्हा परिषद भंडाराचे सभापती रमेश पारधी, पंचायत समितीचे माजी सभापती कलाम शेख, जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर, जिल्हा परिषद सदस्य देवा इलमे, कांग्रेस चे जेष्ठ नेते तुमसर नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष अमरनाथ रगडे, जिल्हा परिषद सदस्य, कृष्णकांत बघेल, प्रमोद तितिरमारे,बाळा ठाकुर, गजानन झंझाड,उमेश्वर कटरे, प्रमोद कटरे, कान्हा बावनकर, विजय शहारे, राजेश हटवार, चैन मसरके, प्रफुल्ल बिसने, यांच्यासहित अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
Embed widget