एक्स्प्लोर

Bhandara News : शेतकऱ्यांना दिलासा! धान खरेदी नोंदणीला पुन्हा महिन्याभराची मुदतवाढ

राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खरीप हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा वाढविण्यात आली आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Bhandara News: भंडारा :  भंडारा जिल्ह्यात (Bhandara News) खरीप हंगामात 258 शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांवर 30 जानेवारीपर्यंत 30 लाख 73 हजार 558.65 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. महानोंदणी अप्लीकेशन आतापर्यंत 1 लाख 53 हजार 709 शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त 93 हजार 240 शेतकऱ्यांनी धान विक्री केली आहे. यावर्षी मागील हंगामाच्या तुलनेत खरेदी कमी प्रमाणात झाल्याने नोंदणीसह धान विक्रीची मुदत दोनदा वाढवून देण्यात आली होती.

ज्यामध्ये धान खरेदीची अंतिम मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती. परंतु, मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात धान आणि भरड धान्याची खरेदी अल्प प्रमाणात झाल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे खरीप हंगामासाठी खरेदीची मुदत आता पुन्हा 29 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कक्ष विजय मोरे यांनी काढले आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

धान खरेदी आणि नोंदणीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने खरीप आणि रब्बी हंगामात धान खरेदी केली जाते. शासनाने खरीप हंगामातील धान खरेदी आणि  नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. ही मुदत काल बुधवार 31 जानेवारीला संपली. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मिळते की नाही याकडे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने धान खरेदी आणि नोंदणीला 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश काढले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोबतच खरेदीसाठी ऑनलाइन पोर्टलवर शेतकऱ्यांना नोंदणीदरम्यान अडचणी येत असल्याने नोंदणीची मुदतसुद्धा 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात येत असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

धानाची भरडाई ठप्पच

राईस मिलर्सच्या मागण्यांवर शासनाने अद्यापही तोडगा काढला नाही. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल आणि भरडाई पूर्णपणे ठप्प झाली आहे. जिल्ह्यातील 183 धान खरेदी केंद्रावर 23 लाख क्विंटल धान तसाच पडला आहे. यापैकी बराच धान उघड्यावर पडून असल्याने त्याची लवकर उचल न झाल्यास तो खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोलBala Nandgaonkar Full Speech : भर उन्हात बसून राज ठाकरेंनी ऐकलं बाळा नांदगावकर यांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
नाशिकमध्ये नामांकित हॉटेलवर निवडणूक अधिकाऱ्यांचा छापा, कोऱ्याकरकरीत नोटांच्या बंडलांनी भरलेली बॅग सापडली
Sanjay Raut: 23 तारखेनंतर फडणवीस-शिंदेंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागतील, दयामाया दाखवणार नाही: संजय राऊत
23 तारखेनंतर देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंचा वेळ पोलीस ठाण्यात हेलपाटे घालण्यात जाईल: संजय राऊत
Sanjay Raut : संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
संजय राऊत गटारातला बेडूक, मोदी-शाहांना गाडण्याची भाषा करणाऱ्या राऊतांवर भाजपचा हल्लाबोल
Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? ज्योतिषाचार्यांचं भाकित
Embed widget