एक्स्प्लोर

Bhandara Rain : तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर 15 भाविकांची सुटका, भंडाराऱ्यातील माडगीच्या नरसिंह मंदिरात अडकले होते भाविक 

तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर माडगी येथील नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

Bhandara Rain : तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर माडगी येथील नरसिंह मंदिरात अडकलेल्या 15 भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. राज्य आपत्ती दलामार्फत भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील माडगी येथील वैनगंगा नदीच्या पात्रात असलेल्या नरसिंह मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविक गेले होते. यावेळी नदीचे पाणी वाढल्यानं 15 भाविक मंदिरातच अडकले होते. अखेर 19 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या भाविकांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. यामध्ये 7 महिला तर 8 पुरुषांचा समावेश होता.

भंडारा- मध्य प्रदेश राज्य मार्गावरील वाहतूक सुरु

पाण्याचा प्रवाह अधिक जास्त असल्यानं त्यांना बाहेर काढणे धोक्याचे होते. मात्र, अखेर राज्य आपत्ती दलामार्फत या भाविकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. तब्बल 18 तासानंतर भंडारा- मध्य प्रदेश राज्य मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. मोहाडीजवळ नाला ओव्वह फ्लो झाल्यानं जिल्हा प्रशासनानं वाहतुकीसाठी रस्ता बंद केला होता. कालपर्यंत तब्बल 4 फुटावर पुलावरुन पाणी वाहत असल्यानं कोणतीही दुर्घटना होऊ नये, म्हणून प्रशासनाला नाईलाजास्तव हा निंर्णय घ्यावा लागला होता. मात्र आता 18 तासानंतर पुलावरील पाणी कमी झाल्यानं पहाटे 5 नंतर येथील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. सध्या वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. 

Bhandara Rain : तब्बल 19 तासांच्या प्रयत्नानंतर 15 भाविकांची सुटका, भंडाराऱ्यातील माडगीच्या नरसिंह मंदिरात अडकले होते भाविक 

भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पावसानं मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळं नदी नाल्यातून पावसाचे पाणी वैनगंगा नदीत येऊ लागल्यानं अचानक वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानं मंदिराला पाण्याने वेढा दिला. त्यामुळं भाविक मंदिरातच अडकले होते. 

भंडारा जिल्ह्यात पावसानं कहरच केला आहे. रात्रभर पाऊस बरसल्यानं जिल्ह्यातील छोटे मोठे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तर भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशला जाणारा मार्गही बंद झाला होता. भंडारा तुमसर मार्गांवरील मोहाडी येथील रस्त्यावरुन दोन फूट पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली होती. भंडारा जिल्ह्यातून मध्य प्रदेशला जोडणारा हा रस्ता पुर्णतः पाण्याखाली गेल्यानं अवजड वाहनधारकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. अखेर संथ गतीनं वाहतूक सुरु झाली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget